ब्रेकिंग : मोशीत कचरा डेपोजवळील इमारत कोसळली; 15 कर्मचारी अडकल्याची भीती

Building collapses 15 workers feared trapped पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथील कचरा डेपो परिसरात इमारत कोसळल्याची घटना

Building Collapses 15 Workers Feared Trapped

Building Collapses 15 Workers Feared Trapped

Building near garbage depot collapses in Moshi, Pimpri-Chinchwad; 15 workers feared trapped : पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथील कचरा डेपो परिसरात इमारत कोसळल्याची घटना घडली असून, ढिगाऱ्याखाली सुमारे 15 जण अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मला शिव्या द्या, महाराष्ट्राला बदनाम करू नका, मिसिंग लिंकवरून विधानसभेत फडणवीसांचा जोरदार पलटवार

घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभाग, वैद्यकीय पथके तसेच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी यंत्रणांकडून प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत नेमकी किती जण अडकली आहेत किंवा जखमींची संख्या किती आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

मोशी कचरा डेपो परिसरात ग्राउंड फ्लोअर प्लस दोन मजली (G+2) आरसीसी संरचनेतील कॅन्टीन व कार्यालयाची इमारत जमिनीखालील पाया खचल्यामुळे कोसळली आहे. घटना दुपारच्या जेवणाच्या वेळेत घडल्याने अनेक कर्मचारी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. सध्या ढिगाऱ्याखाली नेमके किती कर्मचारी अडकले आहेत, याबाबत अधिकृत व अचूक माहिती उपलब्ध झालेली नाही.

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नवीन प्रणालीअंतर्गत 15 जुलैपर्यंत पैसे जमा होणार

प्राथमिक माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या काही कर्मचाऱ्यांचे आवाज ऐकू येत असून ते जिवंत असल्याचे निदर्शनास येत आहे. बचाव पथकाकडून युद्धपातळीवर शोध व बचाव कार्य सुरू आहे. अधिकृत आकडेवारी व पुढील माहितीची प्रतीक्षा आहे. कोणतेही कर्मचाऱ्याचा मृत्यू वगैरे असे काहीही झाल्याची माहिती नाही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. पीसीएमसी फायर डिपार्टमेंट, एनडीआरएफ, पी डी आर एफ, घटनास्थळी एकत्रित बचाव कार्य राबवत आहेत

 

Exit mobile version