पुण्याच्या कॉलेजमुळे प्रेम बिऱ्हाडेची लंडनमधील नोकरी गेली; कॉलेजकडून स्पष्टीकरण आलं…

Prem Birhade : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून प्रेम बिऱ्हाडे या तरुणाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये

Prem Birhade

Prem Birhade

Prem Birhade : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून प्रेम बिऱ्हाडे या तरुणाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये प्रेमने दावा केला आहे की, पुण्यातील मॉडर्न काॅलेजने आपल्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करुन प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्याने आपल्याला ब्रिटनमधील कंपनीत नोकरीची संधी मिळाली नाही. तर आता या प्रकरणात मॉडर्न कॉलेजकडून देखील स्पष्टीकरण समोर आल्याने आता अनेक चर्चांना उधाण आले आहे.

प्रेम बिऱ्हाडेचे (Prem Birhade) सर्व आरोप कॉलजने फेटाळले असून विद्यार्थ्याला प्रमाणपत्र वेळेवर उपलब्ध करुन दिल्याचा दावा केला आहे. कॉलेजने 14 ऑक्टोबरला प्रमाणपत्र दिल्याचे जाहीर केले आहे. प्रेम हा महाविद्यालयाच्या (Modern College) बदनामीसाठी सोशल मीडियाचा वापर करत असून त्याची कृती बदनामी, सायबर छळ आणि समाजाला भडाकवणे या अंतर्गत येतात असं कॉलजेकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

तसेच पोलिसांनी प्रेम बिऱ्हाडेवर कारवाई केली तर प्राध्यपक वर्गाचा छळ आणि महाविद्यालयाची बदनामी थांबेल असं स्पष्टीकरण प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोटे यांनी दिले आहे.

कॉलेजवर आरोप काय?

आपल्या व्हिडिओमध्ये प्रेम बिऱ्हाडेने म्हटले आहे की, पुण्यातील मॉडर्न कॉलजने जातीय भेदभाव करुन व्हेरिफिकेशन केले नाही आणि प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्याने आपल्याला ब्रिटनमधील कंपनीतील नोकरी गमवावी लागली असा आरोप प्रेम बिऱ्हाडेने केले व्हायरल व्हिडिओमध्ये केला आहे.

Afghanistan Cricketers : पाकिस्तानी हवाई हल्ल्यात ठार झालेले तीन अफगाण क्रिकेटपटू कोण? 

माहितीनुसार, प्रेमने मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्समध्ये प्रेमने 2020-24 या कालावधीत बीबीएचे शिक्षण पूर्ण केले होते मात्र यानंतर कॉलेजने जातीय भेदभाव करुन व्हेरिफिकेशन केले नाही असा आरोप या व्हिडिओमध्ये प्रेमने केला आहे.

Exit mobile version