पिंपरी : सन २०१९ च्या तुलनेत म चिंचवडच्या या पोटनिवडणुकीत (Chinchwad Bypoll) मतदानाचा टक्का घसरला आहे. मात्र, घसरलेला हा टक्का नेमकं कुणाचं गणित बिघडवणार आहे. हे मात्र, अद्याप गुलदस्त्यात आहे. त्याचबरोबर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे हे देखील या निवडणुकीत प्रभावी ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. त्यामुळे त्याचा भाजपच्या अश्विनी जगताप (AShwini Jagtap) यांनी फायदा किंवा महाविकास आघाडीचे नाना काटे (Nana Kate) यांना तोटा होणार आहे. मात्र, नक्की कोणाला फायदा किंवा तोटा होणार हे देखील पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सायंकाळी 5 वाजेपर्यंत कसब्यात 45.25 टक्के तर चिंचवडमध्ये 41.1 टक्के मतदान
चिंचवड पोटनिवडणुकीत सायंकाळी पाच वाजेपर्यंत जेमतेम ४१ टक्क्यापर्यंत मतदान झाल्याची आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. सायंकाळी पाच ते सहा वाजेपर्यंतची यात आकडेवारी धरली तरी ४५ ते ४८ टक्क्यापर्यंत जाऊ शकते. मात्र, मागील निवडणुकीच्या तुलनेत ही आकडेवारी खूपच कमी आहे. मागील निवडणुकीत ५६ टक्क्यापर्यंत मतदान झाले होते. त्यामुळे मतदान कमी झाल्याचा नेमका फायदा कोणाला आणि तोटा कोणाला होणार आहे, हे मात्र येत्या २ मार्चला स्पष्ट होणार आहे.