Download App

Congress नेत्याचे शरद पवारांसमोरच वादग्रस्त वक्तव्य : मोदींना पराभूत करण्यासाठी सौदीवरून लोकांना आणा!

  • Written By: Last Updated:

पुणे : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोरच झालेल्या कार्यक्रमात माजी नगरसेवकाने वादग्रस्त वक्तव्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि राष्ट्रीय स्वसंसेवक संघ (RSS) यांना पराभूत करण्यासाठी सौदी अरेबिया आणि दुबईला गेलेल्या लोकांना घेऊन या. तसेच ज्यांचा मृत्यू झाला अशांच्या नावानेही मतदान करून घ्या, असे वादग्रस्त आवाहन काँग्रेसचे पुण्याचे माजी नगरसेवक उस्मान हिरोली (Usman Hiroli) यांनी केले आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत अल्पसंख्यांक समाजाचा मेळावा झाला. त्या मेळाव्यात उस्मान हिरोली बोलत होते.

भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उस्मान हिरोली यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक उस्मान हिरोली बोगस मतदान घडविण्याची योजना उघडपणे आखत आहेत. निवडणूक आयोगाने या वक्तव्याची दखल घ्यावी, अशी मागणी केशव उपाध्यय यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आएसएसला हरविण्यासाठी आपल्या लोकांचे ९९ टक्के नाही तर १०० टक्के मतदान व्हायला हवे. त्यासाठी सगळीकडून लोकांना आणले पाहिजे, असे देखील उस्मान हिरोली यांनी अल्पसंख्यांक समाजाचा मेळाव्यात म्हटले आहे.

Tags

follow us