Download App

पालकमंत्र्यांनी निधी वळविला; चंद्रकांतदादा जिथं दिसतील तिथं आंदोलन करणार : धंगेकर आक्रमक

पुणे : पालकमंत्र्यांच्या आशीर्वादानं कसब्याचा 10 कोटींचा निधी पर्वतीला वळविण्यात आला आहे. त्यामुले कसब्यातील 100 विकासाची कामं खोळंबली आहेत. आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) जिथं दिसतील तिथं आंदोलन करणार असा इशारा कसब्याचे काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी दिला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. धंगेकरांच्या या आरोपांमुळे आता पुण्यातील राजकारण तापण्याची चिन्ह आहेत. (Congress MLA Ravindra Dhangekar accused Guardian Minister Chandrakant Patil of diverting funds)

काय म्हणाले रविंद्र धंगेकर?

पालकमंत्र्यांच्या आशीर्वादानं कसब्याचा 10 कोटींचा निधी पर्वतीला वळविण्यात आला आहे. त्यामुले कसब्यातील 100 विकासाची कामं खोळंबली आहेत. माझ्यावर आरोप करा पण मतदारांचा अवमान होऊ देणार नाही. त्यामुळे आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिथं दिसतील तिथं आंदोलन करणार आहे.  गरज पडल्यास पालकमंत्र्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही यावेळी धंगेकर यांनी दिला.

लेट्सअप मराठीशी बोलताना रविंद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, पोटनिवडणुकीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं की धंगेकर निवडून आले तरी आम्ही त्यांना निधी देणार नाही. त्यांचं हे वाक्य राजकीय व्यासपीठावरील होतं. निवडणूक संपल्यावर आम्ही पुण्याची राजकीय संस्कृती डोळ्यासमोर ठेवून एकत्र आलो. मुक्ताताईंनी ज्या पद्धतीने ह्या मतदार संघात काम करण्याचे ठरवलं होतं त्यानुसार मुक्ताताईंचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम मी कार्यकर्ता म्हणून करणार असल्याचं सांगितलं होतं. पण चंद्रकांतदादांनी हे वाक्य कृतीत आणले.

आठ नऊ वर्षांमध्ये जे हुकूमशाहीचे राजकारण चाललंय, प्रत्येक कार्यकर्ता हा टार्गेट करून त्याच्यावर कुरघोडी करण्याचं काम सुरु आहे. त्यांनी आमच्यावर कुरघोडी करु दे. पण ज्या स्वाभिमानी मतदारसंघांनी मला निवडून दिले, ज्या स्वाभिमान कसबा मतदार संघातला मतदार आहे त्यांच्यावर कुरघोडी करू नका. शेवटी मतदार राजा आहे आणि ह्या मतदार राजाला जर तुम्ही दुखवत राहिला तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये त्याचे उत्तर मिळेल. या अन्यायाचा आम्ही निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये चंद्रकांत पाटील जिथे जिथे दिसतील तिथे तिथे आंदोलन करणार आहोत. त्यांच्या घरी सुद्धा करणार म्हणजे करणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags

follow us