पुणे : राजगुरुनगर या ठिकाणी कॉलेजला गेलेली ती तरुणी अचानक बेपत्ता झाली होती.. सर्वत्र तिचा शोध सुरू होता.. मात्र ती कुठेच सापडत नव्हती.. तपास सुरू असतानाच एक सीसीटीव्ही समोर आलं.. ज्यामध्येही तरुणी एका तरुणाच्या दुचाकीवर बसून जाताना दिसली.. आणि त्या दृष्टीने तपास सुरू असतानाच एक नको असणारी बातमी समोर आली.. या तरुणीचा भीमा नदीपात्रात मृतदेह सापडला.. आणि त्यानंतर तपासाची दिशाच बदलली.. दुचाकीवरील त्या तरुणाचा पोलिसांनी शोध घेतला आणि समोर आलं धक्कादायक सत्य.. कोण होता तो तरुण? आणि या कॉलेज तरुण सोबत नेमकं काय घडलं? पाहूया..
पुण्याच्या भालेराव काकांच बँकॉकमध्ये झेंगाट; मुंबईत परतताच अटक; काकांनी नेमकं केलं तरी काय?
खेड तालुक्यातील रहिवासी असलेली ही मुलगी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात शिक्षण घेत होती.. ११ एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे कॉलेज संपल्यानंतर ती घरी जाण्यासाठी पाबळ रोडवर थांबली होती.. त्याचवेळी त्याठिकाणी आला आरोपी नवनाथ मांजरे.. नवनाथ मांजरे हा या तरुणीच्या गावचाच रहिवाशी.. घराजवळ राहणारा.. चल तुला घरी सोडतो.. असं म्हणून त्याने या तरुणीला दुचाकीवर बसवलं.. घराजवळच राहणारा हा व्यक्ती असल्याने या तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्यासोबत गेली.. आणि इथेच घात झाला..
दरम्यान हा प्रवास सुरू असतानाच मध्येच आरोपीचे शेत लागले. त्याने मला उसाच्या शेताला पाण्याची बारी द्यायचीय.. असं सांगून त्याने या तरुणीला नदीकाठी असलेल्या उसाच्या शेतात नेले. उसात नेल्यानंतर त्याने या अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, तरुणीने विरोध केला असता शेतातील दगड उचलून त्याने तिच्या डोक्यात टाकला.. तरुणी जागीच गतप्राण झाली.. त्यानंतर आरोपीने तिचा मृतदेह ओढत नेत जवळच असणाऱ्या भीमा नदी पात्रात टाकून दिला आणि त्यानंतर काही घडलंच नाही अशा अविर्भावात तो गावात वावरत राहिला.
नवऱ्याचा अघोरी प्रताप! बायकोच्या गुप्तांगात हळदी-कुंकू भरत लिंबू पिळलं, पुण्यात धक्कादायक घडलं
इकडे ही तरुणी बेपत्ता झाल्यानंतर तिचा सर्वत्र शोध सुरू होता. त्यावेळी एका सीसीटीव्ही कॅमेरा आरोपी नवनाथ मांजरे यांच्या दुचाकीवर बसल्याचे दिसून आलं. आणि त्यानंतर लगेचच तिचा मृतदेह सापडला. पोलिसांनी नवनाथ मांजरेला ताब्यात घेतलं पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला की, नाही हे पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर येईल. पोलीस आरोपीकडे चौकशी करतायेत मात्र तो उलट सुलट उत्तर देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय.. सध्या तो आठ दिवसाच्या पोलीस कोठडीत आहे.
मोठ्या बहिणीचा दोन दिवसांवर साखरपुडा म्हणून ती आनंदात होती पण…
दरम्यान 11 एप्रिलला ही मुलगी बेपत्ता झाली. तर, 13 एप्रिलला तिच्या मोठ्या बहिणीचा साखरपुडा होता. त्यामुळे सर्व कुटुंब आनंदात होते. मात्र आदल्या दिवशीच छोट्या बहिणीचा खून झाल्यामुळे कुटुंबासह संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. आरोपी गावातीलंच असल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गाव ते स्माशानभूमीपर्यंत कुठलाही अनुसुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता.
Video : COEP चे माजी विद्यार्थी अन् पुण्यातील प्रसिद्ध व्यवसायिकाचा बिहारमध्ये ‘सायबर मर्डर’
तर, दुसरीकडे आरोपी घटना घडल्यानंतर बिनदक्तपणे गावात हिंडत होता जसे काही घडलेच नाही. खून केल्यानंतर तो जवळच्याच गावात असणाऱ्या यात्रेलाही जाऊन आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी हनुमान जयंती असल्याने तो स्वतःच्या दुकानात नारळ विकत होता. गावातील तरुणी बेपत्ता असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यानेच माझ्या शेतात नदीलगत कोणीतरी बाईचा ओरडण्याचा आवाज आला पण, मी घाबरून तिकडे गेलो नाही असे गावात सांगत होता.. मात्र म्हणतात ना कुठलाही गुन्हा फार काळ लपून राहत नाही. तसचं काहीसं या प्रकरणात झालं अन पोलिसांनी आरोपी नवनाथला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
