पुणे : एका बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीने मद्यधुंद अवस्थेत सोसायटीच्या गेटवर जोरदार राडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वानवडी परिसरात काल (31 डिसेंबर) ही घटना घडली आहे. पोलिसांनी (Police) संबंधित मुलीला काही काळ ताब्यात घेतले, मात्र तिच्यावर कोणतीही कारवाई न करता काही वेळात सोडूनही दिले. ती पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्यानेच कोणतीही कारवाई न केल्याच आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. (daughter of a senior police officer shouted loudly at the gate of the society in a drunken state)
याबाबत अधिक माहिती अशी की, काल नवीन वर्षाचे स्वागत (Happy New Year) करण्यासाठी विविध ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. अशाच एका पार्टीतून संबंधित तरुणी दारु पिऊन आली. ती वानवडी परिसरातील ऑक्सफर्ड कम्फर्ट सोसायटीमध्ये वास्तव्याला होती. पण सोसायटीच्या गेटवर येताच तिने तिथे राडा सुरु केला. सोसायटीच्या गेटवरील सुरक्षा रक्षकाचे टेबल रस्त्यावर ओढून तोडफोड केली. त्यानंतर सोसायटीचे गेट बंद करुन तिथे आरडा-ओरडा सुरु केला. स्थानिक रहिवाशांना शिव्या देण्यास सुरुवात केली.
हा सर्व दंगा ऐकून रहिवाशांनी गेटकडे धाव घेतली. मात्र ती तरुणी कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. अखेर रहिवाशांनी पोलिसांना पाचारण केले, मात्र संबंधित महिनेने महिला पोलीस कर्मचाऱ्यालाही मारहाण केली. यानंतर पोलिसांनी संबंधित मुलीला काही काळ ताब्यात घेतले, मात्र तिच्यावर कोणतीही कारवाई न करता काही वेळात सोडूनही दिले. ती पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्यानेच कोणतीही कारवाई न केल्याच आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.