Download App

काका-पुतणे येणार एकाच मंचावर; PM मोदी, CM शिंदेंच्या उपस्थितीत होणार भेट

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कार सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत. (DCM Ajit Pawar And NCP Chief Sharad Pawar Will meet in Pune for Lokmany Tilak award)

या कार्यक्रमाचे शरद पवार प्रमुख पाहुणे असणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शरद पवार आणि अजित पवार यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या सर्वांनी येण्याचं मान्य केलं असल्याची माहिती आहे.

मराठवाड्यात पाणीबाणी! जायकवाडी धरणाचं पाणी पिण्यासाठी आरक्षित…

दरवर्षी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीदिनी1 ऑगस्ट रोजी पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कार सोहळ्याला मोदी उपस्थितीत राहणार आहेत. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

मोदींच्या दौऱ्यासाठी पवारांची मध्यस्थी :

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या या पुणे दौऱ्यासाठी खुद्द शरद पवार यांनीच मध्यस्थी केली आहे. याबाबत स्वतः पवार यांनी माहिती दिली होती. यावेळी ते म्हणाले होते, काही दिवसांपूर्वी रोहित टिळक माझ्याकडे आले होते. त्यांच्या संस्थेला लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीच्या दिवशी मोदींना सन्मानित करायचे होते. पण त्यांचा मोदींकडे संपर्क होतं नव्हता. तेव्हा ते माझ्याकडे आले. त्यानंतर मी मोदींशी संपर्क केला आणि त्यांच्या कार्यालयाकडून 1 ऑगस्ट या तारखेसाठी होकार आला, असे त्यांनी सांगितले होते.

Baipan Bhaari Deva मधील शशी फेम वंदना गुप्तेंना अटक? नेमकं प्रकरण काय?

बंडानंतर काका-पुतणे पहिल्यांदाच येणार एका मंचावर :

गेल्या आठवड्यात रविवारी अजित पवार पक्षातील 32 ते 35 आमदारांचा गट घेऊन भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांच्यासह 9 आमदारांचा मंत्रिमंडळातही समावेश करण्यात आला. त्यानंतर अजित पवारांनी थेट पक्षावर दावा सांगितला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मेळावे घेतले आहेत. त्यात दोघांनी आपल्याकडे संख्याबळ असल्याचा दावा केला आहे. चाळीसपेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजितदादांनी केला आहे. यामुळे काका-पुतण्यांच्या या भेटीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us