Download App

महिला अधिकारी दमदाटी प्रकरणी फडणवीस तुमच्यावर नाराज? अजितदादा म्हणाले, “त्यांनी मला..”

फडणवीस यांनी अजित पवार यांच्याकडे नाराजी बोलून दाखवल्याचीही चर्चा होती. यानंतर अजित पवार यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे.

Ajit Pawar on Devendra Fadnavis : महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना अजित पवार यांनी दमदाटी केल्याचा ऑडिओ कॉल व्हायरल झाला होता. या प्रकरणावर अजित पवार यांनी ट्विट करत भूमिका स्पष्ट केली होती. यानंतर या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त समोर आले होते. फडणवीस यांनी अजित पवार यांच्याकडे नाराजी बोलून दाखवल्याचीही चर्चा होती. यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पु्न्हा या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. अशा प्रकारच्या बातम्या अजितदादांनी नाकारल्या. आम्हा तिघांत सर्वकाही चांगलं सुरू आहे असे अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार आज पुण्यात होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत (Ajit Pawar) त्यांनी विविध मुद्द्यांवर मत व्यक्त केले. माझं काम दाखवण्यापेक्षा नको त्या गोष्टी दाखवण्यात तुम्हाला (प्रसारमाध्यमे) रस आहे. मग तेच उगाळत बसता. मी मागील 35 वर्ष काम करत असताना कशाप्रकारे वागतो हे विचारा. त्या ठिकाणचं उत्खनन बेकायदेशीर होतं की नाही याचा निर्णय सरकार घेईल. मुख्यमंत्री खंबीर आहेत त्यामुळे काळजी करू नका, असे अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवारांना भिडलेल्या अंजना कृष्णा कोण?, काय करतात आई-वडील?, कुठ अन् कसं झालं शिक्षण 

फडणवीसांची कोणतीही नाराजी नाही 

या प्रकरणात मला जे काही उत्तर द्यायचं होतं त मी ट्विट करून दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील अजित पवार यांना जे काही सांगायचं होतं ते त्यांनी सांगितलं असे म्हटले. मुख्यमंत्र्यांनीही याची नोंद घेतली आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. यानंतर पत्रकारांनी फडणवीसांच्या नाराजीबद्दल प्रश्न विचारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात कोणतीही नाराजी नाही हे आता मी स्टॅम्पवर लिहून देऊ का? आम्ही एकत्र बसतो तेव्हा असं कधीही जाणवलं नाही. मुख्यमंत्री विश्वास देऊन काम करतात. त्यांना चांगला अनुभव आहे. प्रशासन चांगल्या प्रकारे चालवतात. एकनाथ शिंदे यांचीही कारकिर्द पाहिली तर प्रश्न तडीस जावेत आणि लोकाभिमुख कारभार व्हावा असाच तिघांचा प्रयत्न असतो.

आशिया कप क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्याबद्दल विचारले असता 140 कोटी जनता असल्यानंतर वेगवेगळे मतप्रवाह असणार. अनेकांची मतं वेगळी असतात. यामध्ये दोन्ही वर्ग आहेत. दोन्ही वर्गाचं वेगवेगळं म्हणणं आहे. सामना होणार आहे अशी माझी माहिती आहे. ज्या स्तरावर निर्णय घ्यायचा असतो त्या स्तरावर निर्णय घेतला गेला आहे असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

 तर तुमच्याकडे बघतो लक्ष्मण हाकेंची अजित पवारांना धमकी? आरक्षणावरून राजकारण तापलं 

follow us