पुणे : भाजपचे खासदार गिरिश बापट यांना त्यांच्या आजारपणात निवडणुकीच्या प्रचारात उतरुन जीवाशी खेळत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. पुण्यातील कसबा आणि पिंपरी पोटनिवडणुकीसाठी येत्या 27 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून आपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरु आहे.
राजकीय वर्तुळात सध्या गिरीश बापट नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपने खासदार गिरीश बापट यांना प्रचारात उतरवलं आहे. त्यावरून काँग्रेसचे मोहन जोशी आणि राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांनी भाजपवर जोरदार संधान साधलंय.
नवरीला हार घातलाना फटाकड्या वाजल्याने नवरदेव डचकला, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; म्हणाले, “काय…”>
दरम्यान, भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी आज भाजपचे खासदार गिरिश बापट मैदानात उतरले आहेत. गिरिश बापट यांच्यासह भाजपच्या इतर दिग्गज नेत्यांकडूनही जोरदार प्रचार सुरु आहे.
Prithvi Shaw : मुंबईत क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या गाडीवर हल्ला
खासदार गिरीश बापट यांनी काही दिवसांपूर्वीच मी आजारी असून पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार नसल्याचं जाहीर केलं होतं, मात्र भाजपने त्यांना आजारपणात प्रचारासाठी बोलावून त्यांच्या जीवाशी खेळ केल्याचा आरोप काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी केला आहे.
तसेच आजारणामुळे गिरीश बापट यांना चालताही येत नसून भाजप त्यांना प्रचारात उतरवून त्यांच्या प्रकृतीशी खेळत आहे. तुमच्या स्वार्थासाठी गिरीश बापट यांच्या जीवाशी खेळू नका, असं खोचक वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांनी केलं आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गिरीश बापट हे आजारी आहेत. तरी सुद्धा त्यांनी पक्षाचा विजय व्हावा म्हणून ते टिळकवाडा येथे प्रचारासाठी आले होते. व्हील चेअरवर बसून ऑक्सिज नळकांडी लावलेल्या अवस्थेत गिरीश बापट प्रचारात सहभागी झाले होते. यावेळी हेमंत रासने यांनी शाल व पुणेरी पगडी देत त्यांचा सत्कार केला आहे. बापट हे गेल्या अनेक काळापासून मोठ्या आजाराला तोंड देत आहेत. अशा परिस्थितीत देखील ते प्रचारासाठी आले आहेत.
कसब्यातून भाजपकडून हेमंत रासने तर काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. तर दुसरीकडे चिंचवडमध्ये भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आलीय.