Download App

पुण्यात ईडीची मोठी कारवाई! रोझरी स्कूलचे संचालक अऱ्हानांना मोठा धक्का; 47 कोटींची संपत्ती जप्त

पुणे : पुणे शहरात अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) मोठी कारवाई झाली आहे. बँकेच्या फसवणूक प्रकरणात नामांकीत शाळेच्या संचालकांवर कारवाई झाली आहे. (ED Raid Pune) २० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीने मालमत्ता जप्त केली. (Pune Cirme) ईडीच्या या कारवाईमुळे धाबे दाणाणले आहे.
पुण्यात रोझरी एज्युकेशन ग्रुपचे संचालक विनय अऱ्हाना (Vinay Arhana) आणि त्यांचे बंधू विवेक अऱ्हाना यांची ४७ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली. त्यामध्ये रोझरी स्कूलची इमारत आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या जागेचा समावेश आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी २८ जानेवारी रोजी त्यांच्या मालमत्तेवर छापे टाकून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. यानंतर ईडीने १० मार्च रोजी विनय अऱ्हाना यांना अटक करण्यात आली होती. अऱ्हाना आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जप्त केलेल्या मालमत्तेचे बाजारमूल्य ९८ कोटी २० लाख रुपये इतके आहे. विनय अऱ्हाना यांनी शाळेच्या नूतनीकरणासाठी कॉसमॉस बँकेतून २० कोटी ४४ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याकरिता दिलेली कागदपत्रे बनावट होती. अधिकाऱ्यांनी या फसवणूक प्रकरणी विनय आरहाना आणि त्यांचे बंधू विवेक आरहाना यांची लष्कर परिसरातील ४७ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली.

याअगोदर दाखल झाला होता गुन्हा

अरान्हा आणि इतरांविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या आधारे जानेवारी महिन्यात ईडीने अऱ्हाना यांच्या कॅम्पमधील घरी आणि रोझरी शिक्षण संस्थेच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी केली होती.

गुढीपाडवा विशेष : साखरगाठी कशी तयार होते पाहा…

बँकांसंदर्भात दुसरी कारवाई

बँकांच्या फसवणूक प्रकरणात ईडीने केलेली ही दुसरी कारवाई आहे. याअगोदर  सेवा विकास बँकेचे (seva vikas bank) माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्यांवर कारवाई करण्यात आली होती.

सेवा विकास सहकारी बँकेच्या संचालकांनी कर्जांचे १२४ बनावट प्रस्ताव मंजूर केले होते. या प्रकरणात जवळपास ४३० कोटी रुपये विविध व्यक्ती व संस्थांना नियमबाह्य पद्धतीने वितरित केले. ज्या व्यक्तींची कर्ज मिळण्याची पात्रता नव्हती, त्यांना कर्ज देण्यात आले होते. कर्ज देताना परतफेडीची क्षमता व अन्य निकष तपासले गेले नाहीत.

यामुळे बँकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सहकार सहआयुक्त राजेश जाधवर यांनी २०२० मध्ये या कर्जांविषयीचे ऑडिट केले होते. यानंतर हे घोटाळा उघडकीस आले. या प्रकरणात पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी अमर मूलचंद यांच्यासह ५ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर झालेली ही दुसरी कारवाई आहे.

Tags

follow us