Post Office MIS Scheme : भविष्याचा विचार करुन जर तुम्ही गुंतवणूक करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस (Post Office) एक शानदार योजना राबवत आहे. ज्याचा फायदा घेत तुम्ही दरमहा सहज 9 हजार रुपये कमवू शकतात. पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेचे नाव मासिक उत्पन्न (Monthly Income Scheme) आहे. या योजनेत गुंतवणूकदांना एक रकमी रक्कम जमा करावी लागते. ही योजना 5 वर्षाच्या कालावधीसाठी आहे आणि मुदतपूर्तीनंतर गुंतवणूकदाराला त्याचे संपूर्ण पैसे परत मिळतात.
या योजनेत एकाच खात्याद्वारे जास्तीत जास्त 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्याद्वारे जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा करु शकतात. यानंतर तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर दरमहा निश्चित व्याज मिळते. माहितीनुसार, सध्या या योजनेत वार्षिक 7.4 टक्के व्याजदर दिला जात आहे. हे व्याज दरमहा तुमच्या खात्यात जमा होते. या योजनेत कोणीही गुंतवणूक करु शकते. सध्या या योजनेत 7.4 टक्के व्याज मिळत असल्याने गुंतवणूकदाराने त्याच्या पत्नीसोबत संयुक्त खात्यात 14.60 लाख रुपये गुंतवले तर त्याला दरमहा सुमारे 9,003 रुपये व्याज मिळेल.
खाते कोण उघडू शकते?
पोस्ट ऑफिसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या योजनेत 18 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती खाते उघडू शकते. खाते वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तपणे उघडता येते. तसेच एक संयुक्त खाते तीन लोकांसाठी उघडता येते. याचबरोबर पालक 10 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलाच्या नावाने खाते देखील उघडू शकतात.
तर दुसरीकडे देशाची सर्वात मोठी बँक आरबीआयने या वर्षी आतापर्यंत रेपो दरात 1 टक्के कपात केली आहे. त्यामुळे बँक खात्यांवरील व्याजदरात कपात करण्यात आली आहे. मात्र पोस्ट ऑफिसने त्यांच्या या योजनेत व्याजदरात कोणतीही बदल केलेला नाही.