Shivajirao Adhalrao आम्ही चार तास एकत्र… तुम्ही लोकं मलाच का टार्गेट करता?

पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मंगळवारी (दि. २१) कसबा पेठ मतदार संघात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचार सभेसाठी रात्री आले होते. प्रचार सभेनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र, पत्रकार परिषद सुरु असतानाच मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao-Patil) यांचा हात झटकल्याने आढळराव निघून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. नेमक्या […]

Shivajirao Adhalrao Eknath Shinde

Shivajirao Adhalrao Eknath Shinde

पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मंगळवारी (दि. २१) कसबा पेठ मतदार संघात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचार सभेसाठी रात्री आले होते. प्रचार सभेनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र, पत्रकार परिषद सुरु असतानाच मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao-Patil) यांचा हात झटकल्याने आढळराव निघून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. नेमक्या त्याचवेळी माध्यमांच्या कॅमेराने हा क्षण टिपला. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि आढळराव पाटील यांच्या काहीतरी बिनसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली. मात्र, यावर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, चार तास आम्ही दोघेच व्यासपीठावर उपस्थित होतो. त्यानंतर अर्धा तास पत्रकार परिषदेत सोबत होतो, हे तुम्हाला दिसले नाही का. बराच वेळ पत्रकार परिषदेत बसून होतो म्हणून टॉयलेटला जाण्यासाठी उठलो होतो. काहीही संबंध नसताना तुम्ही लोकं मलाच का टार्गेट करत आहात.

कसबा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचार सभेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यादरम्यान हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

याबाबत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, चार तास आम्ही दोघेच व्यासपीठावर उपस्थित होतो. त्यानंतर अर्धा तास पत्रकार परिषदेत सोबत होतो, हे तुम्हाला दिसले नाही का. बराच वेळ पत्रकार परिषदेत बसून होतो म्हणून टॉयलेटला जाण्यासाठी उठलो होतो. काहीही संबंध नसताना तुम्ही लोकं मलाच का टार्गेट करता, ही पत्रकारिता नव्हे, एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही तुमची टीआरपी वाढवता का, असा उलट प्रश्न उपस्थित केला.

Exit mobile version