Download App

गुड न्यूज : पुणे-दौंड प्रवासाचा वेग वाढणार; इलेक्ट्रिक लोकलसाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव

पुणे : पुणे-दौंड प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. या मार्गावर आता इलेक्ट्रिक लोकल चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला असून त्याला अंतिम मान्यता मिळताच या मार्गावरील प्रवासाचा वेग वाढणार आहे. मागील अनेक वर्षांपासून दौंडच्या नागरिकांनी मेमू गाड्या सुरू करण्याची मागणी लावून धरली आहे. डेमू (डिझेलवरील) गाड्यांऐवजी मेमू गाड्या सुरू झाल्यास वाहतुकीचा वेग वाढून प्रवाशांना चांगली सेवा मिळेल, अशी मागणी केली जात होती. (Electric local will now run on Pune-Daund route)

पुणे-लोणावळा याप्रमाणेच पुणे दौंड या मार्गावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र या प्रवासाला कधी दीड तर कधी दोन तास लागतात. अनेकदा गाड्या पास होण्यासाठी दौंड किंवा इतर स्थानकांवर गाड्या 10 ते 15 मिनिट थांबवून ठेवल्या जातात. यामुळे पुणे-दौंड मार्गावरही पुणे-लोणावळ्याप्रमाणे मेमू (इलेक्ट्रिकवर धावणाऱ्या) लोकल गाड्या सुरू कराव्यात अशी मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होते. अखेर या मागणीला आता रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

“पालकमंत्र्यांना ‘ते’ अधिकारच नाहीत!” बोरवणकरांच्या गंभीर आरोपांवर अजितदादांचे प्रत्युत्तर

पुणे-दौंड या मार्गाचे विद्युतीकरण सुमारे चार वर्षांपूर्वी झाले. त्यावेळी लोकलची चाचणीही घेण्यात आली. मात्र इलेक्ट्रिक लोकल सुरु झाली नव्हती. अनेक लोकप्रतिनिधींनी, प्रवासी संघटनांनी आणि विभागीय सल्लागार समितीच्या सदस्यांनी मध्य रेल्वेला पत्रेही पाठवली. नुकतंच विभागीय व्यवस्थापक कार्यालयात झालेल्या खासदारांच्या बैठकीत खासदार वंदना चव्हाण यांनी याबाबतची मागणी केली. त्यावर या संदर्भातील प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे दिला असून, लवकरच याबाबत निर्णय होईल, असे प्रशासनाने सांगितले.

‘अन्’ चिडलेल्या अजितदादांनी नकाशा फेकला… : माजी IPS मीरा बोरवणकर यांचे गंभीर आरोप

दरम्यान, पुणे-दौंड या रेल्वे मार्गाला उपनगरीय मार्गाचा दर्जा मिळावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र उपनगरीय दर्जा देण्याबाबत आता काही सांगू शकत नाही. पण या मार्गावरील डेमू गाड्या हटवून त्यांच्या जागी इलेक्ट्रिकवरील मेमू लोकल गाड्या आम्ही चालविणार आहोत, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांनी दिली.

Tags

follow us