पुणे : बहुचर्चित अशी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीचे मतदान काल पार पडले. ( Kasba Bypoll Election) मतदान पार पडेपर्यंत आणि मतदान संपेपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्यासह काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.
भाजपचे कसब्याचे उमेदवार हेमंत रासने यांच्या मतदानाची जास्तच चर्चा रंगली. हेमंत रासणे यांनी मतदानाला जाताना गळ्यात भाजपचं उपरणं घातलं होतं. कमळाचं चिन्ह असलेलं हे उपरणं घालून त्यांनी मतदान केंद्रात प्रवेश केला आणि मतदान करून बाहेर पडले. या प्रकरणी रासने यांच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शिंदे महाराष्ट्राचे की गुजरातचे मुख्यमंत्री? आदित्य ठाकरेंनी भर सभेत ललकारलं
तर काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप करत उपोषण केलं होतं. भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला होता. पत्नीसह त्यांनी कसबा गणपतीसमोर उपोषण सुरु केलं होतं. हा आचारसंहितेचा भंग असल्याच्या कारणामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. तर रुपाली पाटील यांनी गोपनियतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला.
कसबा आणि चिंचवड विधानसभा पोट निवडणुकांसाठी काल मतदान पार पडलं. मतदानाचा दिवस भाजप आणि महाविकास आघाडीच्या आरोप- प्रत्यारोपांनी गाजला आहे. तर आज मतदानाच्या दुसऱ्या दिवशीही राजकीय घडामोडींना वेग आला.