Download App

पिंपरी चिंचवडच्या तळवडेत फटाका गोदामाला आग, 7 जणांचा होरपळून मृत्यू

  • Written By: Last Updated:

Firecracker warehouse fire : पिंपरी चिंचवडच्या तळवडेत फटाका गोदामाला भीषण आग (Firecracker warehouse fire) लागली आहे. या भीषण आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आगीत आणखी काही कामगार अडकल्याची माहिती आहे. आगीची मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून जवानांकडून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.

दिल्लीतील राजकारण तापले, राहुल गांधींनी अचानक रद्द केला परदेश दौरा 

प्राप्त माहितीनुसार, तळवडे येथील फटाक्यांच्या गोदामाला ही भीषण आग लागली. ही घटना दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. या आगीत सात जणांचा मृत्यू झाला तर आणखी काही मजूर त्यात अडकल्याचे सांगण्यात येत आहे. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाजे जवान, पोलीस आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे जवान सध्या आगीवर नियंत्रण मिळवत आहेत. घटनास्थळी सात ते आठ रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत सात मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, इतर मजुरांचा शोध सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही.

दुग्धविकास मंत्र्यांकडूनच राज्यातील दूध उत्पादकांची बदनामी, बाळासाहेब थोरातांचा गंभीर आरोप 

हा गोदात पोलीस आयुक्तालयाच्या देहूरोड पोलीस ठाणे अंतर्गत येतो. या भीषण घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली असून मृतांमध्ये सहा महिलांचा आणि एका पुरूषाचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. या आगीत गोदामातील अनेक वस्तू जळून खाक झाल्यानं मोठं नुकसान झालं आहे.

हे फटाका गोदाम विनापरवाना आणि अनधिकृतपणे सुरू असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, याविषयी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती पुढं आलेली नाही. या घटनेबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, प्राथमिक माहितीनुसार या गोदामाचा वापर वाढदिवसाच्या केकसाठी वापरल्या जाणाऱ्या कॅण्डलचे हे गोदाम दिसत आहे. दर्घटनेत गंभीर जखमी झालेल्यांना ससून आणि इतर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाकडून माहिती मिळाल्यानंतरच मृतांचा नेमका आकडा सांगता येईल. मृतांची नावं अद्याप समजू शकले नाहीत, असं सिंह म्हणाले.

 

Tags

follow us