Download App

Sanjay Kakade : PM मोदींची कामं पुणेकरांपर्यंत पोहचविताना संजय काकडे चिंब भिजले

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात भाजपच्यावतीने (BJP) वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच कार्यक्रमांतर्गत 9 वर्षांच्या काळात झालेल्या महत्वपूर्ण कामांची माहिती असलेल्या पुस्तिकेचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते काल (25 जून) प्रकाशन करण्यात आले. माजी खासदार संजय काकडे यांच्या वतीने ही पुस्तिका तयार करण्यात आली असून तिच्या 60 हजार प्रती पुणे लोकसभा मतदार संघात वाटप करण्यात येणार आहेत. त्याचा शुभारंभ बावनकुळे यांच्या हस्ते झाला. (Former MP Sanjay Kakade has printed a booklet containing information about the important works done by Prime Minister Narendra Modi during his 9 years)

दरम्यान, या पुस्तिकांचे काल पुणे शहरात वाटप करण्यात आले. सामान्य व्यक्ती, रिक्षा चालक, हॉटेल कामगार अशा सर्वांना ही पुस्तिका देण्यात आली. यावेळी काकडे अक्षरशः पावसात चिंब भिजत होते. पण त्यांनी पुस्तिकांचे वाटप सुरुच ठेवले. पुणे लोकसभा मतदार संघातील भाजी विक्रेत्या पासून ते मॉलपर्यंत, छोटा व्यावसायिक ते उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी, शिक्षक, गृहिणी, डॉक्टरसह सर्व क्षेत्रातील मान्यवर, युवा पिढी आणि ज्येष्ठ नागरिकांना ही पुस्तिका प्रत्यक्ष भेटून देणार आहे.

ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात दबदबा ठेवणारे सूरज चव्हाण कोण ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी आणि देशातील प्रत्येकासाठी काम केले आहे. मोदींच्या दूरदृष्टीकोनातून राबविण्यात आलेल्या योजनांमुळे आपल्या देशाची प्रगती वेगाने होत आहेत. मोदींची ही कामे, त्यांच्या योजना प्रत्येकापर्यंत पोहचविण्याचे काम मी करणार आहे. गोरगरीब जनतेसाठी सेवा व वंचितांचा विकास, शेतकरी कल्याणासाठी योजना, महिला व बालकल्याण विकास, मध्यम वर्गासाठी विकासाच्या योजना, आरोग्य सेवा, आर्थिक सशक्तीकरण, व्यापार व उद्योग क्षेत्राच्या भरभराटीसाठी ठोस योजना, भारत एक महाशक्ती म्हणून उदयाला येण्यासाठी मोदी सरकारकडून आखण्यात आलेल्या योजनांची माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे, असे काकडे यावेळी बोलता म्हणाले.

पवारांनी केली ती मुत्सद्देगिरी, शिंदेंनी केली ती बेईमानी कशी, फडणवीसांचा सवाल

दरम्यान, या पुस्तिकेचे पुणे लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघात प्रत्येकी 10 हजार अशा एकूण 60 हजार पुस्तिकांचे वाटप स्वतः संजय काकडे करणार आहेत. त्या त्या विधानसभा मतदार संघातील 25 ते 30 कार्यकर्ते सोबत घेऊन ही पुस्तिका नागरिकांना देण्यात येणार आहे. यावेळी भाजपाचे नेते व माजी मंत्री दिलीप कांबळे, पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Tags

follow us

वेब स्टोरीज