Download App

पुण्यात खळबळजनक प्रकार, मित्रानेच केला मित्राचा खून; आरोपी फरार

Pune Crime News : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याने कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

  • Written By: Last Updated:

Pune Crime News : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याने कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तर आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील वाघोली परिसरात 4 ऑक्टोबरच्या मध्यरात्री चाकूने वार करुन एकाची हत्या करण्यात आली असल्याची  माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 ऑक्टोबरच्या मध्यरात्री प्यासा हॉटेलसमोर (Pyasa Hotel) एका तरुणाने आपल्या मित्रावर चाकूने वार करून त्याची हत्या (Pune Crime) केली. या हल्ल्यात बादल शेख या तरुणाचा मृत्यू झाला आहे. सध्या या प्रकरणातील आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आणि आरोपी दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून आरोपी फरार झाला आहे. वाघोली पोलिसांकडून (Wagholi Police) त्याचा शोध सुरु आहे.

Coldrif Syrup Ban : मोठी बातमी, दिल्ली, मध्य प्रदेशसह ‘या’ राज्यात कोल्ड्रिफ सिरपवर बंदी

या प्रकरणात फरार आरोपीच्या शोधासाठी वाघोली पोलिसांकडून पथके नियुक्त करण्यात आली असून आता पुरावे गोळा करण्याचे काम सुरु असल्याची माहिती वाघोली पोलिसांकडून देण्यात आली आहे.

follow us