Download App

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या ड्रायव्हरचे मद्यसेवन? ससूनच्या अहवालात मोठा खुलासा

Gautami Patil : गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील राज्यातील राजकारणात चर्चेत आहे. पुण्यातील एका परिसरात तिच्या गाडीचा अपघात झाला असून

  • Written By: Last Updated:

Gautami Patil : गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील राज्यातील राजकारणात चर्चेत आहे. पुण्यातील एका परिसरात तिच्या गाडीचा अपघात झाला असून या अपघातामध्ये तिघेजण जखमी झाले आहे. अपघातात सामील असणारी कार गौतमी पाटीलच्या नावावर असल्याने तिला या प्रकरणात चौकशीसाठी नोटीस देखील पाठवण्यात आली आहे. तर दुसरीकडे गौतमी पाटीलवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी होताना दिसत आहे. तसेच जेव्हा अपघात झाला तेव्हा गौतमी पाटीलच्या गाडीचा ड्रायव्हरने मद्यपान केलं होता अशी देखील चर्चा सध्या जोराने सुरु आहे. तर आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

या अपडेटनुसार, पोलिसांना ड्रायव्हरचा मेडिकल रिपोर्ट मिळाला आहे. संतोष दिनकर उभे (Santosh Dinkar Ubhe) असं या ड्रायव्हरचा नाव असून ससूनच्या प्राथमिक अहवालात ड्रायव्हरने मद्यसेवन (Gautami Patils Car Accident) केले नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

अहवालात काय आहे?

ड्रायव्हरच्या श्वासात मद्याचा वास येत नव्हता. ड्रायव्हरच्या डोळ्यात बाहुल्या नेहमी प्रमाणे होत्या तसेच ड्रायव्हरचे बोलणे देखील स्थिर होते अशी माहिती ससूनच्या अहवालात देण्यात आली आहे. तसेच विश्लेषणात्मक तपासणीसाठी ड्रायव्हरने रक्ताचे नमुने घेतले असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

30 सप्टेंबर रोजी पुण्याती वडगाव पुलाजवळ असलेल्या एका हॉटेलसमोर एक रिक्षा उभी होती. त्यात रिक्षाचालकासह दोन प्रवासी देखील होते. मागून आलेल्या गौतमी पाटीलच्या कारने या रिक्षाला जोरदार धडक दिली.

पुण्यात खळबळजनक प्रकार, मित्रानेच केला मित्राचा खून; आरोपी फरार

या मुळे रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच रिक्षाचालकासोबतच रिक्षातील दोन प्रवासीही गंभीर जखमी झाले. यानंतर कारचालक फरार झाला होता मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी कारचालकाला अटक केली आहे.

follow us