Video: शरद पवार बिग बॉस; ते जबाबदारी देतील ते काम करणार, हर्षवर्धन पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश

काही दिवसांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देत हर्षवर्धन पाटील यांनी अखेल आज शरद पवारांच्या हस्ते एनसीपी शरद पवार पक्षात प्रवेश केला.

Video: हर्षवर्धन पाटलांनी अखेर तुतारी फुंकली; शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश

Video: हर्षवर्धन पाटलांनी अखेर तुतारी फुंकली; शरद पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश

Harshvardhan Patil joined NCP under Sharad Pawar : इंदापूरच्या राजकाराणाचा वनवास संपला असं म्हणत ज्यांनी भाजपला राम-राम केला, ते हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, व्यासपीठावर विजयसिंह मोहिते-पाटील उपस्थित होते.

Video: हर्षवर्धन पाटील क्षमता असलेला नेता; त्यांचा तो निर्णय चुकला, काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

आम्हाला सुप्रिया सुळे यांचा अभिमान आहे. त्या चारवेळा खासदार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला आम्ही त्यांना अदृष्य पद्धतीने काम केलं असा खळबळजनक दावा हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी केला आहे. तसंच, आम्ही सुप्रिया सुळे यांची भाषण कायम ऐकत असतो. अनेक मुद्ये त्या अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडत असतात असंही हर्षवर्धन पाटील यावेळी म्हणाले आहेत.

मला वैयक्तिक काही पाहीजे म्हणून मी हा निर्णय घेताल नाही. तसे निर्णय मी घेत नाही. कारण माझ्यावर तसे संस्कार नाहीत. गेली दहा वर्षापासून मी कुठल्याही संविधानीक पदावर नाही. परंतु, सोबत असलेला समाज कधीच कुठ गेला नाही असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत आपण काम करणार असल्याचं सांगितलं.

साहेब तुम्ही निर्धास्त राहा. फक्त इंदापूर तालुक्यासाठीच नाही तर बारामतीतही आमची गरज पडली तर आम्ही काम करणार असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे. तसंच, तालुक्यात आम्ही सर्व एकत्र येऊन काम करणार आहोत. तुम्ही फक्त आम्हाला जबाबदारी द्या असंही हर्षवर्धन पाटील यावेळी म्हणाले आहेत.

 

बातमी अपडेट होत आहे

Exit mobile version