पुणे : नोंदणी व मुद्रांक विभागातील ढिसाळ कारभाराविरोधात वारंवार मागण्या करून देखील नोंदणी महानिरीक्षक व महसुल मंत्री नोंदणीसाठी येणाऱ्या जनतेचे प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरत आहे. नोंदणी महानिरीक्षक यांचेकडील ५३अ प्रकरणांची शासनामार्फत चौकशी करावी व यास जबाबदार असलेल्या हिरालाल सोनवणे (Hiralal Sonwane) यांना त्वरीत निलंबित करावे, अशी मागणी कॉंग्रेसने कली.
आज नोंदणी व मुद्रांक विभागातील ढिसाळ कारभाराविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्यावतीने काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी, कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी आज विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं. नवीन प्रशासकीय इमारतीसमोर हे आंदोलन करण्यात आलं.
या आंदोलनावेळी नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे यांचा फोटो फ्लेक्स जाळून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
Maratha Reservation वर आज सर्वपक्षीय बैठकीत तोडगा निघणार? फडणवीस म्हणाले…
यावेळी कार्यकर्ते म्हणाले, मध्यंतरी एक बोगस एनए ऑर्डरचं प्रकरणं समोर आलं होतं. त्याविरोधात महुसल प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. हिरालाल सोनवने यांची भाषा देखील नागरिकांसोबत उद्धट असते. बऱ्याचदा रजिस्टर खात्यात चुकीची नोदंदणी केली जाते. त्यामुळं नागरिकांना मनस्ताप होता. या कारणांमुळं नोंदणी विभागातील उपसचिव, सचिव कक्ष अधिकारी, नोंदणी महानिरीक्षक, उपमहानिरिक्षक, सह जिल्हा निबंधक, दुय्यम निबंधक यांचे कामकाज सिसिटीव्ही कॅमेरा अंतर्गत जनतेसाठी खुले करावे, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय, नोंदणी महानिरीक्षक यांचेकडील ५३अ प्रकरणांची शासनामार्फत चौकशी करावी व यास जबाबदार असलेले विधी अधिकारी यांना त्वरीत निलंबित करावे. कल्याण डोंबिवली भागातील २७ गावातील अनधिकृत बांधकाम दस्त नोंदणी प्रकियेची आणि पालघर येथील वसई विरार बोगस दस्त नोंदणीची एस.आय.टी मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी काँग्रेसचे मोहन जोशी म्हणाले, राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे रोहन सुरवसे पाटील यांनी नोंदणी विभागातील अनागोंदी कारभाराविरोधात सातत्याने निवेदने दिली. मात्र महसुलमंत्र्यांनी या संदर्भात कोणतीही दखल घेतली नाही. तसेच, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही. महसुल खाते व्यवस्थित सांभाळता येत नसेल तर विखे पाटील यांनी त्वरीत राजीनामा द्यावा, असं जोशी म्हणाले.