Download App

शरद पवार गटाने आखले ‘मिशन पुणे’, अजित पवारांच्या रोड शोला देणार प्रत्युत्तर

Ajit Pawar Vs Sharad Pawar : राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर पक्ष बांधणीसाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत.अजित पवार यांच्यासोबत शपथ घेतलेल्या मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघात शरद पवारांनी स्वाभिमान सभा घेतल्या होत्या. त्यांच्या सभांंना प्रत्युत्तर म्हणून अजित पवार यांनी उत्तरदायित्व सभा घेतल्या आहेत.पक्षातील बंडखोरीनंतर शरद पवारांनी पुणे जिल्ह्यात कोणतीही सभा घेतली नव्हती. पण यात अजित पवारांनी बाजी मारत बारामतीत रोड शो आणि सभा घेतली होती, तर पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अभिषेक आणि रॅली काढली होती. अजित पवार यांच्या शक्तीप्रदर्शनानंतर शरद पवार गटानेही ‘मिशन पुणे’चा कार्यक्रम आखला आहे.

शरद पवार गटाने येत्या 15 तारखेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीला पुण्यातील सर्वच प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे.

अजित पवार गटाची काही दिवसांपूर्वी बारामती आणि कोल्हापूरला प्रत्युत्तर सभा झाली होती. बारामतीच्या सभेपूर्वी अजित पवार यांनी मोठा रोड शो केला होता. या रोड शोला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर कोल्हापूरच्या प्रत्युत्तर सभेपूर्वी अजित पवार यांनी पुण्यातही मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. रॅलीपूर्वी त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अभिषेक आणि आरती केली होती.

अजित पवारांच्या आमदाराचा लेटर बॉम्ब; थेट PM मोदींना पत्र लिहित शिंदे-फडणवीसांची तक्रार

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यापासून अजित पवार यांनी पुण्यात विशेष लक्ष दिले आहे. विविध विकासकामांचे उदघाटन, प्रशासकीय बैठका घेण्यावर जोर दिला आहे. यातून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत मतभेदही समोर आले होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीही घेत आहेत.

पुण्यात तीन दिवस RSS ची बैठक; राष्ट्रीय अन् सामाजिक मुद्द्यांवर होणार खलबतं

आतापर्यंत शरद पवार यांनी पुणे वगळता उर्वरित महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले होते. पण अजित पवारांच्या शक्तीप्रदर्शनानंतर शरद पवार यांनीही पुण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. शरद पवारांचे जुने सहकारी विधान परिषदेचे माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांच्याकडे पुणे (ग्रामीण) जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.

Tags

follow us