“तुम्हाला विद्रोह दाबता येणार नाही” रॅपर शुभम जाधवच्या अटकेवर जितेंद्र आव्हाड संतापले

“बेकायदेशीररित्या पोलीस स्टेशनला बसवायचे, काहीही चुकी नसताना गुन्हे दाखल करायचे आणि आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीनी फोन केला तर जा फोन घेत नाही जा असं उद्धटपणाने उत्तर द्यायचे ह्याला काय म्हणायचं?” अशी टीका माजी मंत्री जितेंद्र आव्हान यांनी पोलीस खात्यावर केली आहे. नक्की काय म्हणाले आहे ट्विटमध्ये? आपल्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणतात की, “शुभम जाधव ह्या रॅपरला चतु:श्रुंगी […]

Jitendra Awhad

Jitendra Awhad

“बेकायदेशीररित्या पोलीस स्टेशनला बसवायचे, काहीही चुकी नसताना गुन्हे दाखल करायचे आणि आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीनी फोन केला तर जा फोन घेत नाही जा असं उद्धटपणाने उत्तर द्यायचे ह्याला काय म्हणायचं?” अशी टीका माजी मंत्री जितेंद्र आव्हान यांनी पोलीस खात्यावर केली आहे.

नक्की काय म्हणाले आहे ट्विटमध्ये?

आपल्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणतात की, “शुभम जाधव ह्या रॅपरला चतु:श्रुंगी पोलीस स्टेशनं पुणे ह्यांनी ताब्यात घेतले आहे. जसे मला ह्याबद्दल समजले तसे मी शुभमला फोन केला. शुभमने समोर बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला माझा फोन आहे असं सांगितले. समोरच्या पोलीस कर्मचाऱ्याने उद्धटपणाने मला बोलायचे नाही असे उत्तर दिले.”

Prithviraj Chavan मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते?

त्यांनी पुढे लिहले आहे की, “शुभमला मी सांगितले की वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा नंबर मला काढून दे. तर शुभमने त्यांना विचारले असता पोलीस कर्मचारी म्हणाला की माझे वरिष्ठ अधिकारी मोकळे नाहीत ते काही कोणाशी बोलणार नाहीत. मी शुभमला म्हटलं फोन खाली ठेवून दे. एकतर बेकायदेशीररित्या पोलीस स्टेशनला बसवायचे, काहीही चुकी नसताना गुन्हे दाखल करायचे आणि आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीनी फोन केला तर जा फोन घेत नाही जा असं उद्धटपणाने उत्तर द्यायचे ह्याला काय म्हणायचं?” असा सवाल त्यांनी विचारला आहे.

तर “शुभम हा बौद्ध समाजातील मुलगा असून आंबेडकरी चळवळीत काम करतो.” अशी माहिती देखील त्यांनी या ट्विटमध्ये दिली आहे. याशिवाय तुम्हाला विद्रोह दाबता येणार नाही असं लिहीत त्यांनी व्हिडिओची लिंक शेअर केली आहे

Eknath Shinde ; ‘…तर अशा धमक्यांना आमचे आमदार भीक घालत नाहीत’

Exit mobile version