Download App

Kasba By Election बिनविरोध करण्याची जबाबदारी माधुरी मिसाळांवर!

पुणे : कसबा (Kasba By Election) आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा आहे. त्यासाठी भाजपच्या (BJP) नेत्या आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी सर्वच विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांशी संपर्क साधला आहे. दोन्ही जागा बिनविरोध करण्यासाठी पत्र देखील पाठवले आहे. त्या पत्रांच्या उत्तराची आम्ही सर्वजण वाट पाहत आहोत. तसेच राज्यस्तरीय नेते देखील सर्व प्रमुख नेत्यांच्या संपर्कात आहे, असे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले.

आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेली कसबा विधानसभेची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाइं (आठवले गट), शिवसंग्राम, रासप, रयत क्रांती आदींसह महायुतीतील सर्व घटक पक्ष पूर्ण ताकदीने लढवायचा निर्धार आज करण्यात आला. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपा सहयोगी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह बैठक आज संपन्न झाली. याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, बाळासाहेबांची शिवसेनाचे पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे, किरण साळी, अजय भोसले, लीनाताई पानसरे, पुणे जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे, रिपाइं आठवले गट शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, डॉ. सिद्धार्थ धेंडे, ॲड. मंदार जोशी, बाळासाहेब जानराव, शिवसंग्रामचे भारत लगड, कालिंदी गोडांबे, पतितपावन संघटनेचे स्वप्नील नाईक, राजाभाऊ पाटील, दिनेश भिलारे, मनोज नायर, श्रीकांत शिळीमकर, शैलेश टिळक, हेमंत रासने, गणेश बिडकर, धीरज घाटे, संदीप खर्डेकर, सुनीता वाडेकर, प्रमोद कोंढरे, अश्विनी पांडे उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा परंपरागत मतदारसंघ आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी; यासाठी सर्वांची भूमिका आहे. मात्र, तरीही गाफिल न राहता ही निवडणूक भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाइं (आठवले गट), शिवसंग्राम, रासप, रयत क्रांती यांच्यासह सहयोगी घटक पक्ष सर्वजण पूर्ण ताकदीने लढवणार आहेत.

कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्याकडे महायुतीतील सर्वच घटक पक्ष आणि विविध ज्ञाती संस्थांशी संपर्कासाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.

Tags

follow us