Download App

Kasba byelection : ‘धंगेकरांना साडेसाती’; हेमंत रासने यांचे ग्रहमान अनुकूल

  • Written By: Last Updated:

पुणे : संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून राहिलेल्या कसबापेठ (Kasbapeth) आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा उद्या निकाल लागणार आहे. या निवडणुकीत कोण जिंकणार? कोण हरणार? याचीच सर्वांची चर्चा सुरू आहे. खास करून कसब्यात काय होणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. अशातच आता या निवडणुकीच्या निकालाच्या संदर्भातला ज्योतिषी अंदाज समोर आला. पुण्यातील ज्योतिषी सिध्देश्वर मारटकर (Astrologer Siddeshwar Martkar) यांनी हा अंदाज वर्तवला आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार कसब्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारला धक्का बसणार असून भाजपचे हेमंत रासने  (Hemant Rasane) यांचा दणदणीत विजय होणार आहे. तर चिंचवडची जागा भाजप कायम राखणार असून अश्विनी जगताप या मोठ्या फरकारने जिंकतील असा दावा त्यांनी केला आहे.

मारकटकर यांनी सांगिलते की, कसबा मतदार संघातील उमेदवारांच्या पत्रिका आणि त्यांच्या पक्षाच्या पत्रिकांचा अभ्यास करून हा अंदाज वर्तवला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची मला प्राप्त झालेली जन्मतारीख ही १२ मार्च १९६७ आहे. तर भाजपचे हेमंत रासने यांची जन्मतारीख १३ एप्रिल १९७० अशी आहे. ह्या जन्मतारखा जर खऱ्या असतील तर रासने यांचा रवी मेष राषीमध्ये २९ अशावर आहे. तर रवींद्र धंगेकर यांचा रवी कुंभ राशीमध्ये १३ अंशावर आहे. रवी हा सत्तेचा ग्रह आहे. हेमंत रासने यांच्या मेष राशीच्या रवीवरून गूरुच भ्रमण होणारं आहे. हे भ्रमण त्यांच्यासाठी लाभदायक असल्याचं मारकटकर यांनी सांगितलं. ते म्हणाले, रवींद्र धंगेकर यांच्या कुंभ राशीच्या रवीवरून शनीचं होणारं भ्रमण हे धंगेकरांसाठी प्रतिकुल आहे. त्यामुळे धंगेकर यांचा या निवडणुकीत पराभव होईल.

या दाव्याला आधार देतांना ते म्हणाले, या उमेदवारांच्या पक्ष कुंडलीही हेच सांगते. भाजप ची १९८०पत्रिका आहे. त्या पत्रिकेचा अभ्यास करता, मिथून लग्न आणि मेन रवीची ही पत्रिका आहे. तिथंही मेन रवीवरून गुरू चालत असल्याने हा काळ भाजपसाठी अनुकूल आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे धंगेकरांना पराभूत करून विजयी होती. दुसरं म्हणजे, उद्या २ मार्चला निकाल आहे. या दिवशी गुरूवार आहे. त्यामुळे उद्याच्या दिवसांवर गुरूचा अंमल जास्त आहे, असं दिसतं. त्यामुळं भाजप हा गुरूच्या अंमलाखाली येणार पक्ष असल्याने भाजपच्या उमेदवारांचा विजय ठरलेला आहे. यावेळी धंगेकरांच्या मागे साडेसाती असून त्यांचा पराभव ठरलेला असल्याचं ते म्हणाले.

संजय राऊत जाळ्यात सापडले.. जाळे पकडणारी समिती बदलली ! 

चिंचवड पोटनिवडणुकीविषयी बोलतांना मारकटकरांनी सांगितले की, भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीतील नाना काटे व अपक्ष उमेदवार राहुल कलाटे या तिघांच्या जन्मतारखा मला मिळाल्या नाहीत. मात्र, अश्विनी जगताप यांना मिळणारी सहानुभूती पाहता त्यांचं पारडं जड वाटतं. दुसरं म्हणजे, पुनरवसू नक्षत्र हे महिलांसाठी खूप महत्वाचं आहे. आणि हे नक्षत्र अश्विनी जगताप यांच्यासाठी अनुकल. त्यामुळे त्या मोठ्या फरकाने विजयी होतील, असा दावा मारकटकरांनी केला आहे.

Tags

follow us