Kasba Bypoll आजारी असतानाही गिरीश बापट आले मतदानाला

पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) हे आज नाकात नळ्या, ऑक्सिजन सिलेंडर आणि व्हिल चेअरवर आजारी असतानाही कसबा पोटनिवडणुकीत (Kasba Bypoll) केवळ आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले. सायंकाळी बरोबर पाच वाजता शनिवार पेठेतील अहिल्यादेवी हायस्कुल येथे त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट हे मागील काही महिन्यांपासून प्रचंड आजारी आहेत. […]

Amit Shah Girish Bapat

Amit Shah Girish Bapat

पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) हे आज नाकात नळ्या, ऑक्सिजन सिलेंडर आणि व्हिल चेअरवर आजारी असतानाही कसबा पोटनिवडणुकीत (Kasba Bypoll) केवळ आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले. सायंकाळी बरोबर पाच वाजता शनिवार पेठेतील अहिल्यादेवी हायस्कुल येथे त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट हे मागील काही महिन्यांपासून प्रचंड आजारी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मागील आठवड्यात त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी पत्रकार परिषद देखील घेतली होती. तर आज त्यांनी प्रत्यक्ष मतदान देखील केले.

सायंकाळी बरोबर पाच वाजायला अवघी काही मिनिटे शिल्लक असतानाही त्यांनी अहिल्यादेवी हायस्कुल येथे जावून मतदानाचा हक्क बजावला आहे.

Exit mobile version