Pune Teacher and Graduates Constituencies: पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ महायुतीत भाजपच्या वाटेला गेला आहे. दोन्ही जागांवर भाजपचे उमेदवार असणार आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) जागा मिळविण्यासाठी प्रयत्न केला होता. जागा न मिळाल्याने आता बंडखोरी होण्याची शक्यता बळावलीय. आहे. गेल्या निवडणुकीत दोन्ही जागांवर भाजपने (BJP) उमेदवार दिले होते. परंतु दोन्ही जागांवर पराभव झाला होता. महाविकास आघाडीने दोन्ही जागा जिंकल्या होत्या. आता महायुतीत जागा वाटेला घेत भाजप वरचढ ठरला आहे.
भाजपकडून कौस्तुभ गावडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. गावडे कोल्हापूर येथील श्री विवेकानंद स्वामी शिक्षण संस्थेचे कार्यकारी अधिकारी आहे. या संस्थेचे अध्यक्ष उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आहेत. चंद्रकांत पाटील यांनी हा मतदारसंघ भाजपकडे घेत आपला निकटवर्तीय व्यक्तीला उमेदवारी मिळून दिलीय. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आग्रही होती. उद्योगमंत्री उदय मंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय सचिन सानप, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे हेही इच्छुक होते. या दोघांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली होती. त्याच्यामुळे त्यांची काय भूमिका आहे हे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुख्यमंत्री कार्यालयात पोस्टींग ते MPSC अध्यक्ष! भीमनवारांची कारकीर्द अन् आरोपांचा डोंगर?
संभाजीनगर राष्ट्रवादीला, अमरावती शिवसेनाला
पुणेबरोबर नागपूर पदवीधर मतदारसंघ भाजपकडे गेले आहे. संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळू शकतो. तर अमरावती शिक्षक मतदारसंघ शिवसेनेला मिळणार आहे.
काँग्रेसला तीन जागा
काँग्रेसने तीन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातून विद्यमान आमदार अभिजित वंजारी, पुणे शिक्षक मतदारसंघातून विद्यमान आमदार जयंत आसगावकर, अमरावती शिक्षक मतदारसंघातून आदिती पोहरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला संभाजीनगर व पुणे पदवीधर या जागा मिळू शकतात. पण शिवसेनाला एकही जागा मिळू शकत नाही, अशी परिस्थिती आहे.
महायुतीमध्ये बंडखोरी
पुणे पदवीधर मतदारसंघ हा भाजपकडे गेला आहे. हा मतदारसंघ मिळविण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रयत्न केले होते. प्रताप ऊर्फ भैय्या माने यांच्यासाठी मुश्रीफ हे प्रयत्न करत होते. भाजपकडे जागा गेल्यानंतर भैय्या माने यांनी बंडखोरीचे निशाण फडकावले आहे. माझ्या भविष्याच्या आड येऊ नये, असे सांगत भैय्या माने यांनी पदवीधर निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. तर महायुती म्हणून मला भाजपसोबत राहवे लागेल, असे सांगत मुश्रीफ यांनी माझा आणि भैया माने यांचा संबंध संपला, असे जाहीर केले आहे.
