Kudalwadi of Pimpri-Chinchwad Major action by Municipal Corporation and Police against illegal places of worship : पिंपरी चिंचवड महापालिकेने कुदळवाडी येथील धार्मिक स्थळावर काल मध्यरात्री बुलडोजर चालवत मोठी कारवाई केली आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने मध्यरात्री कुदळवाडी परिसरातील काही धार्मिक स्थळांवर बुलडोजर चालवला आहे. कुदळवडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणातअनधिकृत धार्मिक स्थळ उभारण्यात आली होती.
खासदार लंके यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा…रूबी हॉलमध्ये राजकीय नेत्यांच्या भेटी
त्या अनुषंगाने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने काल मध्यरात्री ही कारवाई केली आहे. यापूर्वी देखील कुदळवाडी आणि चिखली परिसरामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेने व्यापाऱ्यांच्या अनधिकृत आस्थापनांवर बुलडोझर चालवत मोठी कारवाई केली होती. त्यानंतर काल मध्यरात्री पुन्हा एकदा महापालिकेच्या वतीने कुदळवाडी परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर बुलडोजर चालवण्यात आल आहे.
आईंसोबत खास लंच, क्रेडिट्समध्ये आईचं नाव; ‘मर्दिनी’ टीमने मातृत्वाला केला अनोखा मानाचा मुजरा
यावर बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले, देश विघातक प्रवृत्तींना आश्रय देणाऱ्या बेकायदेशीर प्रार्थनास्थळांना जमीनदोस्त केले, याचा अभिमान आणि समर्थन पण हिंदू प्रार्थनास्थळांचेही यामध्ये नुकसान झाले. याची खंत वाटते. पण, राष्ट्र सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड करणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे फेब्रुवारी 2025 मध्ये अनधिकृत भंगार दुकाने आणि अतिक्रमणावर कारवाई करून सुमारे 1000 एकर क्षेत्र अतिक्रमण मुक्त करण्यात आले.
शेअर बाजारात मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे तब्बल ₹6 लाख कोटी बुडाले, सेन्सेक्स 1,000 अंकांनी कोसळला!
मात्र, अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई करावी, यासाठी आम्ही हिंदुत्ववादी संस्था- संघटना विविध स्थरावर गेले वर्षभर मागणी करत होतो. अखेर प्रशासनाने काही अंशी कारवाई केली. यामध्ये मशिदि सोबत काही हिंदु धार्मिक स्थळे सुद्धा हटवली आहेत. मात्र, सदर हिंदू धार्मिक स्थळे अधिकृत ठिकाणी नियमानुसार पुनः स्थापित करण्यासाठी पुढाकार घेणार आहोत, असा संकल्प आम्ही सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि संघटनानी केला आहे.
