लोणावळ्यातील 4 मोठ्या हॉटेल्सवर FDA ची धडक कारवाई; ऑर्किड, रिदम, फर्न आणि बेसिलिकाचे परवाने निलंबित

Lonavala FDA Action: लोणावळ्यातील नामांकित हॉटेल्समध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

Lonavala FDA Action: लोणावळ्यातील नामांकित हॉटेल्समध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

Lonavala FDA Action: लोणावळ्यातील नामांकित हॉटेल्समध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

Lonavala FDA Action: पुणे : लोणावळ्यातील नामांकित हॉटेल्समध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) 18 नोव्हेंबर रोजी केलेल्या अचानक तपासणीत चार मोठ्या हॉटेल्समध्ये गंभीर त्रुटी आढळल्या. त्यानंतर 19 नोव्हेंबर रोजी या चारही हॉटेल्सचे अन्न परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले. यामध्ये दि ऑर्किड, रिदम, द फर्न आणि बेसिलिका या हॉटेल्सचा समावेश आहे.

चांदीचे भाव कोसळले! 10 महिन्यांत किलोमागे अडीच लाखांची घसरण; आता दर आणखी कमी होणार?

अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाने ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ (Safe Food, Safe Maharashtra) मोहिमेअंतर्गत ही कारवाई केली. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 आणि स्वच्छतेच्या नियमांचे (Schedule-IV) उल्लंघन झाल्याचे आढळले.

ऑर्किड हॉटेलमध्ये मुदतबाह्य दुधाची पाकिटे

वलवण येथील दि ऑर्किड हॉटेलच्या स्वयंपाकघरात 3 आणि कोल्ड स्टोरेजमध्ये 8 अशी एकूण 11 मुदतबाह्य दुधाची पाकिटे आढळली. अन्नपदार्थांची साठवणूक करताना FIFO आणि FEFO नियमांचे पालन केले जात नव्हते. कच्चे आणि शिजवलेले पदार्थ एकत्र ठेवले होते. फ्रीज, चॉपिंग बोर्ड आणि स्वयंपाकघरातील इतर भाग अस्वच्छ होते. तसेच कर्मचाऱ्यांकडून आवश्यक संरक्षक कपड्यांचाही वापर केला जात नव्हता.

रिदम हॉटेलमध्ये झुरळांचा वावर

तुंगार्ली येथील रिदम हॉटेलच्या स्वयंपाकघर आणि बेकरी विभागात फ्रीजजवळ झुरळे आढळली. शाकाहारी-मांसाहारी तसेच कच्चे आणि शिजवलेले पदार्थ वेगवेगळे ठेवले जात नव्हते. फ्रीजमधील पदार्थ आणि सॉसच्या बाटल्यांवर लेबल नव्हते. पेस्ट कंट्रोलची नोंद आणि कर्मचाऱ्यांच्या FoSTaC प्रशिक्षणाची प्रमाणपत्रेही उपलब्ध नव्हती.

तुकाराम मुंढेंच्या FDA चा राज्यभरात कारवाईचा धडाका! 2.23 कोटींचा अन्नसाठा जप्त, 23 परवाने निलंबित

बेसिलिका हॉटेलमध्ये मुदतबाह्य चीज आणि ब्रेड

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील बेसिलिका हॉटेलच्या कोल्ड स्टोरेजमध्ये मुदतबाह्य चीज आणि ब्रेड आढळले. हे पदार्थ जागेवरच नष्ट करण्यात आले. कच्च्या चिकनमधून रक्तमिश्रित पाणी गळत असल्याचेही आढळले. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसाठी स्वतंत्र फ्रीज व भांड्यांची व्यवस्था नव्हती. याशिवाय अन्न रंग आणि अजिनोमोटोचा वापर होत असतानाही मेन्यू कार्डवर त्याची माहिती दिलेली नव्हती.

द फर्न हॉटेलमध्ये मुदतबाह्य खाद्य रंगांचा वापर

द फर्न हॉटेलच्या बेकरी विभागात मुदतबाह्य खाद्य रंग वापरले जात असल्याचे तपासणीत समोर आले. हे रंग ताज्या अन्नपदार्थांसोबतच ठेवण्यात आले होते. प्रशासनाने हे रंग जागेवरच नष्ट केले. याशिवाय स्वयंपाकघरात मेलेले आणि जिवंत झुरळे आढळली. मसाले आणि कापलेली फळे उघडी ठेवण्यात आली होती. बेकरीमधील यंत्रसामग्रीची नियमित स्वच्छताही केली जात नसल्याचे आढळले.

मनोज बाजपेयी अभिनीत सुधीर मिश्रा आणि अनुभव सिन्हा यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासनाने हॉटेल आणि खाद्यपदार्थ व्यावसायिकांना स्वच्छता, अन्न साठवणूक आणि परवान्याच्या अटींचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आस्थापनांवर परवाना निलंबित किंवा रद्द करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा FDA चे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे.

Exit mobile version