पुण्यात फक्त घरपोचच गॅस सिलिंडर मिळणार; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

LPG Cylinder Shortage: गोदाम, गॅस एजन्सी किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून थेट गॅस सिलेंडरचे वितरण पूर्णपणे बंद ठेवणार.

Lpg Gas Shortage Pune Collector Jitendra Dudi

Lpg Gas Shortage Pune Collector Jitendra Dudi

LPG Cylinder Shortage: इस्रायल, अमेरिका, इराण युद्धाचा फटका आपल्याला बसू लागला आहे. पेट्रोल, डिझेल सहजपणे मिळत असले तरी एलपीजी आणि सीएनजी गॅसचा (LPG Cylinder Shortage) तुटवडा निर्माण झाला आहे. पुणे शहरात तर व्यावसायिक वापराचा गॅसपुरवठा थांबविण्यात आलेला आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांवर व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे. पुण्यातील अनेक हॉटेल्स बंद झाले आहेत. तर घरगुती गॅसचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे सिलिंडर मिळविण्यासाठी नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना गॅस पुरवठ्यात अडचणी येऊ नयेत म्हणून पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी ( District Collector Jitendra Dudi) यांनी नवीने आदेश दिले आहे.

गॅस बुकिंग केल्यानंतर गॅस एजन्सीला 96 तासांच्या आत सिलेंडर घरपोच देणे बंधनकारक राहील, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.पुणे जिल्ह्यातील सर्व तेल कंपन्या व गॅस एजन्सींच्या प्रतिनिधींना घरगुती गॅस सिलेंडर वितरणाबाबत महत्त्वाच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

गोदाम, गॅस एजन्सी किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून थेट गॅस सिलेंडरचे वितरण पूर्णपणे बंद ठेवण्याच्या तेल कंपन्या व वितरकांना सूचना दिल्या आहेत.नियमानुसार सुरू असलेल्या गॅस सिलेंडर वितरण प्रक्रियेत कोणीही अडथळा निर्माण केल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश पोलिस प्रशासनालाही देण्यात आले आहे.

Exit mobile version