Download App

इर्शाळवाडीतील भीषण दुर्घटना का घडली? कारणं देत माधव गाडगीळांचे सरकारवर ताशेरे

  • Written By: Last Updated:

Madhav Gadgil : कोकणात पावसामुळं हाहाकार उडाला आहे. इर्शाळवाडी गावात काल रात्री दरड कोसळून भीषण दुर्घटना झाली. आतापर्यंत बारा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेत. ढिगाऱ्याखालून 103 जणांना बाहेर काढण्यात आले असून आणखी काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होतेय. अतिवृष्टीमुळं हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ (Madhav Gadgil) यांनी या घटनेवर भाष्य करत गाडगीळ समितीच्या शिफारशी मान्य न केल्यानं ही घटना घडल्याचं सांगितलं. (Madhav Gadgil on Terrible accident in Irshalwadi and Gadgil Committee Report)

https://www.youtube.com/watch?v=YvWYxKSfwwg

आज माधव गाडगीळ लेट्सअप मराठीशी संवाद साधला. त्यावेळी इर्शाळवाडीत घडलेल्या घटनेला नेमकं जबाबदार कोणं? असा प्रश्न विचारताच गाडगीळ पुराव्यानिशी मांडलेला अहवाल मान्य न केल्यानं ही घटना घडल्याचं स्पष्ट केलं. ते म्हणाले, व्यवस्थित शास्त्रीय पुराव्यानिशी मांडलेले निष्कर्ष मान्य न करणं आणि लोकांना निर्णय प्रक्रिेयेत न सहभागी न करणं या दोन गोष्टी इर्शाळवाडीतील घटनेला जबाबदार आहेत.

गाडगीळ समितीने आपल्या अहवालात ‘पश्चिम घाट क्षेत्रात येणारे क्षेत्र संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करावे. या संवेदनशील भागात खाण प्रकल्प, धरण प्रकल्प आणि वीजनिर्मिती प्रकल्पांना परवानगी देऊ नये, अशा अशा शिफारशी केल्या होत्या. ह्या शिफारशी अद्याप मान्य करण्यात आल्या नाहीत. यावर बोलतांना गाडगीळ म्हणाले, अहवाल मान्य न करण्याचं दु:ख नाही. साधारणता: सरकारला कोणीही प्रांजळपणे आणि व्यवस्थेतील भ्रष्टाचार निसर्गाच्या हानीला कसा जबाबदार आहे, हे स्पष्ट मांडून अहवाल लिहिले जात नाहीत. महाबळेश्वरमध्ये विहीरी खोदायच्या असल्या तर असं सांगितलं जातं की, हा संवेदनशील भाग आहे, इथं विहिर खोदायला परवानगी नाही. आणि नंतर प्रत्येक विहिरीमागे पंचवीस हजार रुपये लाच खाऊन विहीर खोदायला परवानगी दिली जाते. हे मी पुराव्यानिशी अहवालात मांडलं. त्यामुळं प्राजंळपणे आणि पुराव्यानिशी लिहिलेला अहवाल मान्य होईल ही अपेक्षा नाही, अशी खंतही गाडगीळ यांनी बोलून दाखवली.

IND vs WI: नाणेफेक जिंकत वेस्ट इंडिजने घेतला गोलंदाजीचा निर्णय, मुकेश कुमारचे कसोटीत पदार्पण 

प्रशासने या घटना घडू नये यासाठी काय केलं पाहिजे, असं विचारताच गाडगीळ यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. ते म्हणाले, आपल्या देशात शास्त्रज्ञांची दडपशाही थांबवली पाहिजे. हिमालयात उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात हाहाकार झाला. त्यावेळी सरकारने जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या लोकांना सांगितलं की, तुम्ही याबाबत बोलायचं नाही. याचे जाहीर आदेश काढले गेले. अशा पद्धतीने शास्त्रीय माहिती दडपल्या जाते, हे अयोग्य आहे. खुल्या पध्दतीने जे काही खरं असेल ते माडंण्याची मुभा असावी, असं गाडगीळ म्हणाले.

या घटनापासून वाचवण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? असं विचारतचा गाडगीळ यांनी सांगितलं. या घटना कोणाच्या हातात नसतात. त्यामुळं सामान्य माणूस काय घेणार? मात्र, त्यांनी प्रशासनाविरोधात एकजुटीने आवाज उठवायला पाहिजे. दरम्यान, या घटनांचे काही इशारे निसर्गाकडून मिळत असतात. ह्या घटना घडतात तेव्हा छोटी मोठी भुस्खलने होत असतात. गेल्या दहा वरषात छोट्या भुस्लखनाचे प्रमाण 100 टक्के वाढल्याचं गाडगीळ म्हणाले.

 

 

Tags

follow us