IND vs WI: पहिल्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 141 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. त्याच वेळी, आता दोन्ही संघ दुसऱ्या कसोटीसाठी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये आमनेसामने आहेत. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया प्रथम फलंदाजी करेल. वेगवान गोलंदाज मुकेश कुमार भारताकडून कसोटी पदार्पण करत आहे. सध्या भारतीय संघ 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने पुढे आहे. टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिका 2-0 अशी खिशात घालायची आहे. कॅरेबियन संघाला हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवायची आहे. (West Indies India 2nd Test Queens Park Oval Port Of Spain Trinidad)
मुकेश हा उजव्या हाताचा मीडिया फास्ट बॉलर आहे. देशांतर्गत सामन्यांमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. मुकेशने 70 प्रथम श्रेणी डावात 149 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान 40 धावांत 6 विकेट घेणे ही त्याची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने 6 वेळा पाच किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत. मुकेशने 24 लिस्ट ए सामन्यात 26 विकेट घेतल्या आहेत. त्याने टी-20 मॅचमध्ये 32 विकेटही घेतल्या आहेत. मुकेशला आयपीएलच्या शेवटच्या मोसमात खेळण्याची संधी मिळाली. तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत होता.मुकेशने आयपीएल 2023 च्या 10 सामन्यात 7 विकेट घेतल्या. यादरम्यान 30 धावा देऊन 2 बळी घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन-
यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज
वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन-
क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), टॅगनारिन चंद्रपॉल, किर्क मॅकेन्झी, जर्मेन ब्लॅकवुड, अॅलिक अथानाझ, जोशुआ दा सिल्वा (डब्ल्यू), जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन, शॅनन गॅब्रिएल