पुणे-शिरुर उड्डाणपुल फक्त शिक्रापूरपर्यंतच; फक्त पैसे कमावण्यासाठी ठेकेदार अन्… पाचंगेंचा गंभीर आरोप

Sanjay Pachange on Expansion of Pune-Shirur Highway हा आदेश लोकांची फसवणूक करणारा आहे. असा आरोप संजय पाचंगे यांनी का केला?

Sanjay Pachange On Expansion Of Pune Shirur Highway

Sanjay Pachange On Expansion Of Pune Shirur Highway

Maharashtra BJP Alliance Vice President Sanjay Pachange on Expansion of Pune-Shirur Highway : राज्य सरकारने पुणे-शिरूर महामार्गाच्या विस्ताराला मंजुरी दिली असून पुणे-अहिल्यानगर NH 753F मार्गावर 35 किलोमीटरचा सहा पदरी उन्नत मार्ग उभारला जाणार आहे. पुणे, शिरूर, वाघोली, शिक्रापूर आणि लोणीकंद परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मात्र हा आदेश लोकांची फसवणूक करणारा आहे. कारण या रस्त्याचा ज्यांनी पाठपुरावा केला त्या महाराष्ट्र भाजप आघाडीचे उपाध्यक्ष संजय पाचंगे यांनीच असा आरोप केला आहे. त्यांनी हा आरोप का केला? यावर त्यांच्याशी लेट्सअप मराठीने संवाद साधला त्यावेळी ते काय म्हणाले जाणून घ्या…

पुणे-शिरूर महामार्गाच्या विस्ताराला मंजुरी फसवी?

2025 मध्ये राज्य सरकारने जेवढा रस्ता केंद्रिय मंत्री नितीन गडकरींनी मंजूर केला होता. तेवढाच पुणे ते शिरूर 53 किमीचा उड्डाणपूल मंजूर केला. पण हा आदेश डावलून राज्य रस्ता सुविधा विकास मंडळाने हा रस्ता रद्द करून तो पुणे ते शिरूर ऐवजी पुणे ते शिक्रापूर पर्यंतच ठेवला आहे. याचा अधिकार देखील त्यांना नव्हता. त्यामुळे पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ती सुटणारच नाही.

ब्रेकिंग : राजधानी दिल्लीत भीषण आग्नीतांडव; 21 जणांचा होरपळून मृत्यू; मृतांमध्ये अनेक विदेशी प्रवासी

त्यांनी हा पूल रद्द केला याला संभाजीनगर ते पुणे नवा हायवे होणार आहे. तो शिक्रापूर पासून पुढे जोडायचा आहे. म्हणून उड्डाणपूल शिरूर पर्यंत करण्याची गरज नाही असं कारण दिलं जात आहे. पण तसं नसून याला ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची युती कारणीभूत आहे. त्यांना खर्च तेवढाच ठेवला अंतर कमी केलं. कारण हा प्रश्न परत निर्माण झाला पाहिजे आणि पुन्हा तो रस्ता करायला घ्यायचा त्यासाठी वेगळी रक्कम टाकायची. असं फक्त पैसे कमावण्यासाठी जनतेला वेठीस धरलं जात आहे. आरोप यावेळी पाचंगे यांनी केला.

 

Exit mobile version