कोचिंग क्लासेसच्या शिखर संघटना अध्यक्षपदी डॉ. पी. कुलकर्णी यांची निवड

स्टेट कॉन्सोर्टियम ऑफ कोचिंग टीचर्स अँड इन्स्टिट्यूट महाराष्ट्र या शिखर संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. प्रशांत गणेश उर्फ पी. कुलकर्णी यांची एकमताने निवड झालीयं.

P Kulkarni

P Kulkarni

Maharashtra Coaching Classes organization News : मुंबई येथे महाराष्ट्रातील नऊ कोचिंग क्लासेस संघटनांची बैठक पार पडली. या नऊ संघटनांची शिखर संघटना असलेल्या स्टेट कॉन्सोर्टियम ऑफ कोचिंग टीचर्स अँड इन्स्टिट्यूट महाराष्ट्र (Maharashtra Coaching Classes organization) या शिखर संघटनेच्या अध्यक्षपदी साताऱ्याचे डॉक्टर प्रशांत गणेश उर्फ पी. कुलकर्णी यांची एकमताने निवड करण्यात आली.

या शिखर संघटनेमध्ये महाराष्ट्रातील नऊ संघटना एकत्रित काम करतात. यामध्ये महाराष्ट्रातील खाजगी कोचिंग क्लासेस संचालकांची सर्वात मोठी संघटना म्हणजे प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य (पिटीए) तसेच मुंबई क्लास ओनर्स असोसिएशन – मुंबई, कोचिंग क्लासेस प्रोप्रायटर असोसिएशन – ठाणे, असोसिएशन ऑफ कोचिंग क्लास ओनर्स अँड मेंटॉर्स – मुंबई, असोसिएशन ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूट – नागपूर, खाजगी कोचिंग क्लासेस संघ – नागपूर, कोचिंग क्लासेस वेल्फेअर असोसिएशन – नाशिक, कोचिंग क्लासेस असोसिएशन – छत्रपती संभाजी नगर, अशा नऊ संघटनांचा समावेश आहे. या नऊ संघटनांनी एकत्र येऊन मुंबईमध्ये शिखर संघटना स्थापन केलेली आहे.

महाराष्ट्र शासन कोचिंग क्लासेस नियमन आणि नियंत्रणासाठी जो कायदा आणू पहात आहे या संदर्भात महाराष्ट्रातील लाखो कोचिंग क्लासेस संचालकांची बाजू सरकार समोर एकत्रितपणे मांडण्यासाठी ही शिखर संघटना स्थापन झालेली आहे. डॉ. पी. कुलकर्णी हे महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन म्हणजेच पीटीएचे देखील राज्य अध्यक्ष आहेत.

आता त्यांच्यावर इतर नऊ संघटनांना एकत्रित घेऊन शिखर संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो क्लास संचालकांची बाजू सरकार पुढे मांडण्याची प्रमुख जबाबदारी अत्यंत विश्वासाने दिली आहे. शिखर संघटनेच्या अध्यक्षपदी डॉक्टर पी. कुलकर्णी यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्रात सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे आणि त्यांच्या कार्यास शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Exit mobile version