kasaba Chinchwad Bypoll : कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेते कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केला. मात्र, त्यातुलनेत रविवारचा सुटीचा दिवस असतानाही मतदान संथच राहिले आहे. या दोन्ही मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत जेमतेम झाल्याचे दिसत आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत कसबा मतदारसंघात 45.25 टक्के तर चिंचवड मतदारसंघात 41.1 टक्के मतदान झाले आहे.
वाचा : कसब्यात एका बूथवर 1 हजार बोगस मतदान, भाजप आमदार Madhuri Misal यांचा आरोप
या दोन्ही मतदारसंघात सकाळपासूनच मतदान अत्यंत संथ होते. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मतदानात वाढ होईल असा अंदाज होता. अजूनही अंतिम मतदानाची आकडेवारी हाती आलेली नाही. अंतिम आकडेवारी मिळाल्यानंतरच किती टक्के मतदान झाले. किती मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला याची माहिती समोर येईल. काही मतदान केंद्रांवरील मतदान संपले आहे. मतदानाची अंतिम आकडेवारी अजून मिळालेली नाही. यासाठी आणखी काही वेळ लागणार असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
हल्लेखोरांना तत्काळ गजाआड करा; काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला मारहाणीचा खुलासा
आज सकाळी सात वाजल्यापासून कसबा आणि चिंचवड या पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली. मात्र, सकाळच्या सत्रात मतदारांचा फारसा उत्साह दिसून आला नाही. त्यामुळे कसब्यात ६.५ टक्के तर चिंचवडला केवळ ३.५२ टक्के इतकेच मतदान झाले होते. सकाळी ११ नंतर मात्र मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडू लागले. कसब्यात दुपारी १ वाजेपर्यंत १८.५ तर चिंचवडला २०.६८ टक्के इतके मतदान झाले होते.
दुपारी तीन वाजेपर्यंत कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदार संघात समसमान मतदानाची टक्केवारी होती. कसब्यात ३०.०५ टक्के तर चिंचवड मतदार संघात ३०.५५ टक्के असे मतदान झाले होते.