Download App

मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यात कोल्डवॉर? काँग्रेसच्या आरोपांवर अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar : अजित पवार यांनी सरकारमध्ये एन्ट्री घेतल्यापासून सरकारमधील शिंदे गटाचे महत्व कमी होत असल्याची चर्चा सातत्याने होत आहे. आताही मंत्रालयातील वॉर रूमचा मुद्दा उपस्थित करत अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकारांवर अतिक्रमण केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांनी सुरू केलेल्या नव्या प्रोजेक्ट मॅनेजनमेंट युनिटवरुनही हल्लाबोल केला होता.

‘आप’ला आणखी एक धक्का; संजय सिंह यांच्यापाठोपाठ खासदार राघव चढ्ढाचेंही राज्यसभेतून निलंबन

या घडामोडीनंतर अजित पवार यांनीच स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवार यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केली. प्रसारमाध्यमांनीही थोडी खात्री करून बातम्या द्यायला हव्यात. मात्र तसं होताना दिसत नाही. काल कोल्ड वॉरच्या बातम्या चालल्य. मात्र त्यात काहीच तथ्य नाही. मुळात मुख्यमंत्री स्वतःच प्रत्येक गोष्टीची माहिती घेत असतात. आम्ही सत्तेत सहभागी झालो आहोत ते जनतेच्या हितांसाठी. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठीच आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत.

अर्थमंत्री म्हणून आढावा घेऊ शकतो

मी अर्थमंत्री म्हणून बैठका घेऊ शकतो तरीदेखील शेवटचा निर्णय मुख्यमंत्रीच घेत असतात. राधेश्याम मोपलवारही तिथं होतो. मात्र तरीही बातम्या नको त्या चालल्या. आपल्याला काय त्रास होतो, हेच कळत नाही. सरकार कोणाचंही असो अंतिम निर्णय हे सर्वोच्च असणारे मुख्यमंत्रीच घेत असतात, असे अजित पवार म्हणाले.

ब्रिटीश कायदा रद्द, पण त्यांच्यापेक्षा भयंकर… संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका

यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनाही चांगलच सुनावलं. विरोधी पक्षनेते काय बोलतात. त्यांचं पद महत्वाचं आहे तेव्हा त्यांनी जबाबदारीने बोलायला हवं. मुख्यमंत्र्यांना थोडा त्रास झाला होता, म्हणून आम्हीच त्यांना विश्रांती घ्यायला पाठवलं होतं. त्यावेळी हवामान खराब असल्यानं त्यांना तिथं पोहचायला अडचण झाली. आज ही चांदणी चौकातील पुलाच्या उद्घाटन सोहळ्याला येणार नाहीत. विकासकामांना गती देण्यासाठी आढावा घेतला की यंत्रणा जोमाने कामाला लागते. जनतेचे प्रश्न मार्गी लागतात. विरोधक मात्र काहीही बोलतात, असा टोला त्यांनी लगावला.

Tags

follow us