Download App

सोमवारपासून चांदणी चौकातील वाहतूक बंद; पुणेकरांनो, ‘या’ पर्यायी मार्गांचा वापर करा

Pune Traffic : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक (Pune Traffic) 10 एप्रिल पासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामार्गावरील चांदणी चौकातील नवीन उड्डाणपुलाचे उद्घाटन येत्या 1 मे रोजी होणार आहे. या पुलाचे काम आता 90 टक्के पूर्ण झाले असून लवकरच गर्डर टाकण्यात येणार आहे. त्यामुळे येथील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार असून चांदणी चौकातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.  हे काम  येत्या दोन दिवसात  सुरू होण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar यांनी घेतली ‘त्या’ सरपंचाच्या कुटुंबियांची भेट!

चांदणी चौकातील सर्व्हिस रोडचे काम पूर्ण झाले असून या काळात या रस्त्याचा पर्याय राहणार आहे. 10 एप्रिल रोजी सर्व्हिस रोड सुरू होणार आहे त्यामुळे या चौकातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्यानुसार राज्य सरकारकडून लवकरच परिपत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.

Pune Breaking : नदी पात्रात सापडले नारायणेश्वर मंदिराचे अवशेष?

मुळशीकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. बावधन ते सातारा आणि वेदभवन ते मुळशी या सर्व्हिस रस्त्यांचेही काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी या पर्यायी रस्त्यांचाही वापर करता येणे शक्य होणार आहे. 10 एप्रिलपासून हे पर्यायी रस्ते खुले करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.

दरम्यान, यामुळे येथील वाहतूक विस्कळीत होणार आहे. मात्र काम वेळेत पूर्ण करायचे असल्याने येथील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. येथील काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे 10 एप्रिलपासून चौक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Tags

follow us