Download App

चंद्रकांतदादांचा अजब सल्ला ! कार्यकर्त्यांना म्हणाले, आता पैसे खर्च करा..

Chandrakant Patil : राज्य सरकारमधील मंत्री तथा भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) नेहमीच त्यांच्या वक्तव्याने वाद ओढवून घेत असतात. त्यांनी केलेली वक्तव्ये राजकारणात चांगलीच चर्चिली जातात. आताही त्यांनी असे एक वक्तव्य केले आहे ज्यामुळे विरोधी पक्ष नाही पण त्यांच्याच पक्षातील नेत्यांना थोडे अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. पाटील यांनी काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुण्यात काही जणांना भारतीय जनता पार्टीत (BJP) प्रवेश दिला. त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी उपस्थित असणाऱ्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना अजब सल्ला दिला. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

ते म्हणाले, ‘याआधीही पुण्यातील श्याम देशपांडे, स्वाती मोहोळ यांचा पक्षात प्रवेश केला आहे. तुम्ही पाहतच राहा प्रवेशाची मालिकाच लागणार आहे. भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. देशातील सगळ्याच महत्वाच्या पदांवर भारतीय जनता पक्षाची माणसे आहेत. जवळपास अठरा राज्यांचे मुख्यमंत्री भाजपचे आहेत. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की या पक्षात आपले स्वागत होईल का, तर काळजी करू नका. नव्या लोकांचे स्वागत करणारी ही पार्टी आहे. सन्मान करणारी ही पार्टी आहे. त्यामुळे पक्षात येणाऱ्य प्रत्येकाचा येथे सन्मानच होतो.’

करुणा मुंडे करणार मोठा राजकीय गौप्यस्फोट; दाखवणार ‘तो’ व्हिडीओ

‘सरकार यायचे असेल तर पार्टी मोठी होणे गरजेचे आहे. सरकार येण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी पार्टी वाढवणे गरजेचे आहे. जुन्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अशावेळी मन मोठे ठेवले पाहिजे. या आम्ही इतके बळकट आहोत की तुम्ही आल्याने पार्टी आणखी मजबूत होणार आहे’, असे धोरण जुन्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ठेवले पाहिजे.

‘पार्टीत येणाऱ्यांना निश्चितच सन्मान मिळणार आहे. पदाधिकाऱ्यांनाही सांगतो की रोज एक नवीन प्रवेश व्हायलाच पाहिजे. प्रत्येक वेळी असा कार्यक्रम, माईकचीही गरज नाही. येणाऱ्याच्या गळ्यात फक्त मफलर घालायचा. त्याला काहीतरी जबाबदारी द्यायची. इतकचं करा. पक्षात येणाऱ्यांचीही आपण छानबीन करू. पण, पक्षात नवीन प्रवेश झालेच पाहिजेत.’

आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने बनावट पत्र; अखेर गुन्हा दाखल

‘या पार्टीत काम केल्याशिवाय काहीच मिळत नाही. परिश्रम घेतल्याशिवाय मोठे पद कसे मिळणार ?, सध्या सरकार आपलेच आहे. सरकारच्या अनेक योजना आहेत तेव्हा रोज नवीन योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करा. थोडे खिशातून पैसे खर्च करण्याची तयारी ठेवा’, असा सल्ला पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. त्यांच्या या वक्तव्याने तेथे उपस्थित असणाऱ्या अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या.

 

 

Tags

follow us