Download App

Pune News : भोलावाले टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई; फरासखाना पोलिसांच्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल!

Pune News : पुण्यात टोळी तयार करून दहशत निर्माण करत सातत्याने गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या तौफिक रियाज भोलावले टोळीवर पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्याच्या प्रस्तावास पुणे शहर पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांनी पूर्वमान्यता दिली आहे. फरासखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांच्यामार्फत सादर करण्यात आला होता.

जुन्या भांडणाचा राग मनात धरून तौफिक भोलावाले आणि त्याच्या साथीदारांनी एका जणााला मारहाण केली होती. या प्रकरणात फरासखान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासात तौफिक रियाज भोलावाले (रा. कसबा पेठ, पुणे), ऋतिक राजेश गायकवाड, उजेर शाहिद शेख, अरमान इकबाल शेख, रफिक जाफर शेख यांना अटक करण्यात आली.

Pune News : सिम्बायोसिस कॉलेजच्या शिक्षकाला हिंदू देवतांवर बोलणं भोवलं! डेक्कन पोलिसांनी केलं अटक…

या गुन्ह्याचा तपासामध्ये टोळी प्रमुख तौफीक रियाज भोलावाले याने आपल्या नावाने टोळी तयार केल्याचे समोर आले. मागील सहा वर्षांपासून गुन्हेगारी कारवाया करत असून त्याच्यावर व त्यांच्या साथीदारांवर प्राणघातक शस्त्र बाळगणे, खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, बेकायदेशीर जमाव जमवून नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, आपल्या टोळी सदस्यांकडून गुन्हे घडवून आणणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करत होते. त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिपबंधात्मक कारवाई करूनही त्यांनी वारंवार गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले.

टोळीप्रमुखावर एकूण 9 गुन्हे दाखल आहेत. त्याने व त्याच्या साथीदारांनी संघटीत संघटीत दहशतीच्या मार्गाने गुन्हा केल्याचे दिसून आल्याने प्रस्तुत गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातील कलमांचा अंतर्भाव करण्यासाठीचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांनी अपर पोलीस आयुक्तांना पाठवला होता. या प्रस्तावाला पुणे शहर पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांनी पू्र्वमान्यता दिली आहे.

दहशतवाद्यांना पैसे पुरवणारा झुल्फिकार बडोदावाला 11 ऑगस्टपर्यंत ATS कोठडीत

दरम्यान, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनात शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. त्यानुसार प्रभावी कारवाई केली जात आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत ही 43 कारवाई असल्याचे सांगण्यात आले.

Tags

follow us