Download App

‘दि पूना पोलीस सोसायटीला सहकार्य करू’ युवा उद्योजक पुनीत बालन यांचा शब्द

Pune News : मागील शंभर वर्षांहून अधिक काळ पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी कार्यरत असलेली कल्याणकारी संस्था म्हणजे दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून पोलीस अधिाकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात. याच कृतज्ञतेच्या भावनवेतून सोसायटीच्यावतीने युवा उद्योजक पुनीत बालन यांना निमंत्रित करण्यात आले होते. बालन यांनीही संस्थेच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. संस्थेतील विविध कामकाजाची माहिती घेतली. संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घोरपडे यांनी त्यांचे स्वागत करून संस्थेच्या कामकाजाची माहिती दिली.

पुनीत बालन यांनी नवनिर्वाचित संचालक मंडळाला शुभेच्छा देऊन संस्थेच्या सर्व उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बालन यांनी सोमवार पेठ पोलीस लाईन येथील कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन संस्थेच्या कामाची माहिती घेतली. दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड संस्थेची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात जून १९२० रोजी झाली. या संस्थेत पुणे शहरासह, पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस, सीआयडी, क्राईम, एसआरपीएफ, अॅन्टीकरप्शन, एस.आय.डी, वायरलेस आणि इतर विभागातील तब्बल 13 हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी या संस्थेचे सभासद आहेत.

Pune Lok Sabha: मुरलीधर मोहोळ यांच्या पाठीशी उद्योजक पुनीत बालन यांची ‘युवा’ ताकद !

या संस्थेच्या माध्यमातून अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. संस्थेच्या चोख आणि काटेकोर कारभारामुळे २०२१ ला संस्थेला आयएसओ हे मानांकनही मिळाले आहे. या संस्थेच्या संचालक मंडळाची गेल्या महिन्यात निवडणूक झाली. या नवनिर्वाचित संचालकाशीही पुनीत बालन यांनी संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले. तसेच कार्याचे कौतुक करत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

‘दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटी’ ही पोलिस बांधवांच्या प्रत्येक अडचणींच्या वेळी तत्काळ मदतीला धावून जाणारी संस्था आहे. या संस्थेच्या आजवरच्या सर्व संचालक मंडळाने केलेल्या उत्तम कारभारामुळे संस्थेची भरभराट होत असून नवीन संचालक मंडळही असाच कारभार करुन संस्थेला अधिक उंचीवर नेईल, असा विश्वास पुनीत बालन यांनी यावेळी व्यक्त केला.

कुस्तीपटूसाठी सरसावला ‘पुनीत बालन ग्रुप’,‘महाराष्ट्र केसरी’ सिकंदर शेख यांच्याशी करार

follow us

वेब स्टोरीज