Download App

Nitin Gadkari : पुण्यात लवकरच धावणार स्कायबस! गडकरींनी सांगितला नवा प्रोजेक्ट

Nitin Gadkari : पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. गडकरी यांनी आपल्या भाषणात आगामी काळात पुणे शहराला प्रदूषणमुक्त करण्याबरोबरच नवीन योजनांची माहिती दिली. गडकरी म्हणाले, पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी हवेतून चालणाऱ्या वाहनांची योजना लवकर आणण्यात येईल.माझी अजितदादा आणि चंद्रकांतदादा यांना एकदा विनंती आहे की एकदा याचे एकदा प्रेझेंटेशन पहावे. पुण्यातील वाहतुक कोंडीवर हा चांगला पर्याय होईल. एकदा स्कायबसची सफर करायला हवी.

ब्रिटीश कायदा रद्द, पण त्यांच्यापेक्षा भयंकर… संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका

पुण्याच्या विकासासाठी चाळीस हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.यामधे दोन-तीन मजली उड्डाणपूल आहेत. पुणे आता अधिक वाढवू नका. पुणे प्रदूषित करु नका. मला भारतातून पेट्रोल आणि डिझेल हद्दपार करायचेय. इथेनॉल, मिथेनॉल आणि हायड्रोजन याचा वापर वाढवा. हायड्रोजन हे भविष्य आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मिती करु नका तर कचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करा. तेच भविष्य आहे.

पुण्याला पेट्रोल डिझेलपासून मुक्त केले तर चाळीस टक्के प्रदूषण कमी होईल. पुण्यातील कचऱ्याचा उपयोग रिंग रोड तयार करण्यासाठी वापरला तर पुण्यात कचरा उरणार नाही. मी पन्नास हजार कोटीत पुण्याचे सर्व उड्डाणपूल बांधून द्यायला तयार आहे. चांदणी चौकाचे नाव बदलण्याच्या चर्चा सुरू आहेत. आता दोन्ही दादांनी म्हणजेच चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांनी मिळवून ठरवावे. त्याला मी मान्यता देईल. देशातून पेट्रोल आणि डिझेल हद्दपार करणार असून यासाठी वेगवेगळे पर्याय अंमलात आणले जातील, असे गडकरी म्हणाले.

शिंदेंची नाराजी, CM पदावर डोळा अन् 40 रूपयांच्या टाळ्या; अजितदादांनी गाजवला चांदणी चौक

आता पुण्यात आणखी वाहने आणि शहराचा विकास करण्यासाठी जागा नाही. त्यामुळे आता पुणे आणखी वाढवू नका. शहरातील वाहतूक नियंत्रित करून शहर प्रदूषण मुक्त बनवा अशी विनंती गडकरी यांनी आपल्या भाषणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना केली.

Tags

follow us