पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी प्रदेश उपाध्यक्ष, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती तसेच मागील लोकसभा निवडणुकीतील इच्छुक उमेदवार मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) हे तब्ब्ल २२ महिन्यानंतर तुरुंगाबाहेर आले आहेत. त्यांच्यावर पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या फसवणुकीसह खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, बाहेर येताच ‘एक डाव भुताचा झाला आहे. दुसरा डाव देवाचा असणार आहे, असे वक्तव्य करत तो दुसरा डाव माझाच असेल असे म्हटल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. बांदल यांनी नक्की कोणत्या राजकीय विरोधकाला इशारा दिला आहे. याचीच चर्चा सुरु आहे. येत्या रविवारी (दि.२६) रोजी आपली भूमिका जाहीर करणार आहेत.
पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या फसवणुकीसह मंगलदास बांदल यांच्यावर खंडणीचे देखील गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे मागील २२ महिन्यांपासून ते जेलमध्ये होते. जामीन मंजूर झाल्याने शुक्रवारी ते तुरुंगाबाहेर आले.
Ajit Pawar यांचा भाजपवर गंभीर आरोप… गुंडांना घेऊनच मंत्री फिरत होते!
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली होती. पुढे ते शिरूर लोकसभा मतदार संघात निवडणुकीसाठी प्रबळ दावेदार होते. मात्र, अडीच-तीन वर्षांपूर्वी बांदलांना पक्षविरोधी कारवायांचे कारण सांगून पक्षातून बाहेर काढण्यात आले.