Download App

मनोज जरांगेंची मोठी घोषणा; 288 मतदारसंघात देणार उमेदवार, राजकीय पक्षांना घाम फोडणार

एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. विधानसभेला राज्यतील 288 मतदारसंघात उमेदवार देणार असल्याची घोषणा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलीय.

Manoj Jarange Patil Big Statement: मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना (Manoj Jarange Patil) पुणे कोर्टाकडून दिलासा (Pune court) देण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातील वॉरंट शिवाजीनगर न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे. मनोज जरांगे यांना 2012-2013 सालच्या एका जुन्या (Pune News) प्रकरणावरून हे वॉरंट बाजवण्यात आला होता. तर 500 रूपयांचा दंड ठोठावण्यात आला.

दरम्यान, न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना 2013 साली कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फसवणुकीचा गुन्ह्यामुळे वॉरंट बजावले होते. यासंदर्भात मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आज कोर्टात तारीख होती, कायदा सर्वांना सारखा आहे, न्यायाची प्रक्रिया सुरू आहे. कायद्याचा सन्मान करून आलो. राज्य सरकारला सध्या काय सापडत नाही. म्हणून ही केस ओपन झाली काय ? मी जातीवाद काही करत नाही.

प्रशासनात भूकंप! पुणे जिल्हाधिकाऱ्यामुळे आत्महत्येची वेळ; प्रांताधिकाऱ्याचा गंभीर आरोप

गेल्या काही दिवसाखाली बीडमध्ये मी आव्हान केलं आहे. मी पाडा अस बोललो पण कुणाला हे म्हटलं नाही. आता 4 जून पासून पुन्हा एकदा आंदोलन करणार आहे. पुढे म्हणाले की, लोकसभेला जरी उमेदवार उभे केलेले नसले तरी विधानसभेला सर्वच्या सर्व 288 जागांवर उमेदवार देणार आहोत. आता कोणाला पाडा हे सांगितलेले नाही. पण त्याचा कोणी गैर अर्थ काढू नये म्हणजे झालं. मी किंवा समाजाने आजिबात कोणाला देखील पाठिंबा दिलेला नाही. तसेच एक अपक्ष देखील उमेदवार उभा केलेला नाही, असे जरांगे यांनी जाहीर केले.

follow us