Deenanath Mangeshkar Hospital : पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे (Deenanath Mangeshkar Hospital) डॉ. सुश्रूत घैसास हेच दोषी असून घटनेला तेच जबाबदार आहेत. त्यामुळे घैसास यांच्यासह त्यांच्यासोबत असणाऱ्या सर्व व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी केलीयं. दरम्यान, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांच्यावर उपचारासाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला. पर्यायी भिसे कुटुंबियांवर दुसऱ्या रुग्णालयात उपचार करावे लागले असून यादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
पुढे बोलताना गोरखे म्हणाले, पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉक्टरच जबाबदार आहेत. या घटनेला जे कोणी जबाबदार व्यक्ती असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून ते कारवाई करण्यास सक्षम असल्याचं आमदार गोरखे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय.
“सुटका तर नाहीच पण, त्यांना माफीही नाही”, मंगेशकर रुग्णालय प्रकरणी सुप्रिया सुळे आक्रमक
तर दुसरीकडे गर्भवती महिला तनिषा भिसे यांची गोपनीय माहिती सार्वजनिक केल्याप्रकरणी महिला आयोगाने राज्य वैद्यकीय परिषदेला निर्देश देण्यात आले आहेत. कारवाईचा चौकशी अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचीही माहिती समोर आलीयं.र्भवती महिलेच्या मृत्यूचं खापर डॉ. केळकर (Dr. Kelkar) यांनी राहु-केतुवर फोडलं होतं. तनिषा भिसे (Tanisha Bhise) मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या अडचणी वाढल्या आहेत. धर्मादाय आयुक्तांच्या अहवालात डीन डॉ. केळकर दोषी असल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता मंगेशकर रूग्णालय प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी धर्मादाय आयुक्तांचा अहवाल आता समोर आलाय. पन्नास पानांचा अहवाल सादर केला गेलाय.
तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला, त्यादिवशी 7 कोटी 47 लाख रूपये रक्कम मंगेशकर रूग्णालयाकडे शिल्लक होती. जी निर्धण किंवा अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींच्या उपचारासाठी आहे. धर्मादाय आयुक्तालयाची पाचजणांची समिती (Pune News) होती. हा अहवाल दोन दिवस आणि एक रात्र असं सलग बसून बनवण्यात आलाय. काल सकाळी हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आला. या अहवालात डॉ. केळकर जे डीन आणि संचालक आहेत, तेही दोषी आढळून आलेत. त्यांचं स्टेटमेट देखील धर्मादाय आयुक्तालयाने रेकॉर्ड केलेलं आहे.