Download App

पोलिसांच्या नावे तीन लाखांची खंडणी; आमदाराच्या चुलत भावासह एक अटकेत, पुण्यात खळबळ

  • Written By: Last Updated:

पुणे : पोलिसांच्या नावे तीन लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी एकजण पुरंदरचे आमदार संजय जगताप (MLA Sanjay Jagtap) यांचा नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे पुणे शहरात आणि जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणात संजय जगताप यांचा काही संबंध आहे का? अशा चर्चांनादेखील सुरूवात झाली आहे. अक्षय सुभाष मारणे आणि गणेश बबनराव जगताप (रा. सासवड, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे असून, गणेश जगताप हा युवक काँग्रेसचा प्रदेश महासचिवही आहे.

Nana Patole ; अमृता आमची सुनबाई, देवेंद्र लहान भाऊ पण गृहमंत्री म्हणून…

या सर्व प्रकरणात तक्रारदाराने सासवड पोलीस ठाण्यात अर्ज केला असून, यात सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घोलप यांच्या नावाने तीन लाखांची खंडणी मागणी करण्यात आल्याचे नमुद करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणात गणेश जगतापने मदत केल्याचे सांगितले जात आहे. गणेश जगताप हा पुरंदरचे आमदार संजय जगताप यांचा जवळचा नातेवाईक असून, तो युवक काँग्रेसचा प्रदेश महासचिवदेखील आहे.

देशातील सर्वात मोठे राष्ट्रीय स्तरावरील ‘महापशुधन एक्सपो शिर्डीमध्ये

या सर्व प्रकरणात अक्षय आणि गणेश हे दोघे इतर काही राजकीय नेत्यांची कामे करत असल्याचीही चर्चा आहे. गणेश जगतापला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आल्याने पुणे आणि जिल्ह्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या सर्व घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून, चौकशीत आणखी काय माहिती समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us