Download App

मनसेचं ठरलं! पवारांच्या बारामतीत ‘राज’गर्जना; मोरेंनी सांगितलं प्लॅनिंग

Maharashtra Politics : राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. राजकीय पक्षांनी (Maharashtra Politics) तयारीला सुरुवात केली आहे. भाजपाने 48 खासदारांचा नारा दिला आहे तर महाविकास आघाडीने जोरदार टक्कर देण्याची रणनीती आखली आहे. प्रमुख राजकीय पक्षच नाही तर आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे. मनसेने थेट राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारंसंघालाच धक्के देण्याचा प्लॅन आखला आहे.

मनसे सध्या पक्षबांधणीवर भर देत आहे. यासाठी स्वतः राज ठाकरे (Raj Thackeray) आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) राज्यात दौरे करून सभा घेत आहेत. आता राज ठाकरे लवकरच बारामतीत मेळावा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

“सनातन धर्म डेंग्यू, मलेरियासारखा… तो नष्टच करायला हवा”; CM स्टॅलिन यांचे सुपुत्र अडचणीत

राज्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष (Maharashtra Politics) आणि जवळ आलेल्या निवडणुका या पार्श्वभुमीवर मनसेने (MNS) बारामती मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) बारामती दौऱ्यावर आले होते. येथे त्यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बारामती शहरात लवकरच राज ठाकरे कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत, असे त्यांनी सांगितले. मोरे म्हणाले, बारामती लोकसभा मतदारसंघांतील (Baramati Lok Sabha Constituency) विधानसभा मतदारसंघांचाही आढावा घेतला जात आहे. सध्या लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी चाचपणीही सुरू आहे. आता लवकरच बारामती शहरात राज ठाकरे मेळावा घेतील त्यासाठीच मी येथे आलो आहे.

पुणे जिल्ह्यात मनसेचं नेटवर्क तयार करणार

दरम्यान, सध्या मनसेकडून पुणे जिल्ह्यातील गावागावात पक्षबांधणीच्या (Maharashtra Politics) कामाला सुरुवात करण्यात आली आहे. याची जबाबदारी वसंत मोरे यांच्याकडे देण्यात आली आहे. सध्या त्यांनीही बारामतीकडे जास्त लक्ष दिले आहे. या मतदारसंघात पक्षविस्तार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठीच त्यांचा बारामती दौरा आहे, असे सांगितले जात आहे. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता राज ठाकरे यांच्या आगामी बारामती दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

Sonia Gandhi : काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची प्रकृती बिघडली; दिल्लीतील रुग्णालयात दाखल

मनसेचा पहिला खासदार 100 टक्के मीच असेन, पण…

मनसे कार्यकर्ते आमदार म्हणून तुमच्याकडे (Maharashtra Politics) पाहत आहेत याबद्दल विचारले असता मोरे म्हणाले, नाही. मला तर यावर्षी खासदार व्हायचं आहे. पुण्याचा खासदार होण्यास मी इच्छुक आहे. मला वाटतं की माझ्या पक्षाने मला संधी दिली तर यावर्षी महाराष्ट्रातला पहिला मनसेाचा खासदार हा वसंत मोरे 100 टक्के असेल.

Tags

follow us