मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मयत नागेश गायकवाड यांच्या पत्नीने गळफास घेऊन संपवलं जीवन

Nagesh Gaikwad : महिन्याभरापूर्वी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील मोशी कचरा डेपो परिसरातील वेस्ट- टू- एनर्जी प्रकल्पातील दुर्घटनेत मयत

Nagesh Gaikwad

Nagesh Gaikwad

Nagesh Gaikwad : महिन्याभरापूर्वी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील मोशी कचरा डेपो परिसरातील वेस्ट- टू- एनर्जी प्रकल्पातील दुर्घटनेत मयत झालेल्या नागेश गायकवाड यांच्या पत्नीने आत्महत्या करत जीवन यात्रा संपवल्याची माहिती समोर आली आहे. सोनाली नागेश गायकवाड असं आत्महत्या केलेल्या महिलेच नाव असून या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, 8 जुलै 2026 रोजी मोशी कचरा डेपो (Moshi Garbage Depot) परिसरातील दुर्घटनेत नागेश गायकवाड (Nagesh Gaikwad) यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सोनाली नागेश गायकवाड यांनी गळाफास घेत आत्महत्या केली. गायकवाड दांपत्याला दोन मुली आहेत, परंतु ठीक एक महिन्यानंतर नागेश यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. नागेश गेल्यानंतर त्या तणावात होत्या, दुःखी होत्या, यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प दुर्घटना

मोशी कचरा डेपो परिसरातील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या इमारतीवर 8 जुलै 2026 रोजी कचऱ्याचा मोठा ढिगारा कोसळला होता. त्यावेळी इमारतीत कामगार उपस्थित होते. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले होते. या दुर्घटनेनंतर दीर्घकाळ चाललेल्या बचाव आणि शोधमोहीमेनंतर 9 कामगारांचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली होती. मृतांमध्ये 26 वर्षीय नागेश गायकवाड, रा. संजय गांधी नगर, मोशी, यांचाही समावेश होता. या दुर्घटनेनंतर ठेकेदार कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

उद्योगांचे स्थलांतर रोखण्यासाठी सरकार सक्रिय; उद्योगमंत्री उदय सामंत यांची चाकणमध्ये 16 ऑगस्टला निर्णायक बैठक

नागेश गायकवाड यांच्या कुटुंबावर दुहेरी आघात

या दुर्घटनेत 26 वर्षीय नागेश गायकवाड यांचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या महिनाभरात त्यांच्या पत्नी सोनाली गायकवाड यांनी देखील आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. गायकवाड दांपत्याला दोन मुली आहेत.नागेश गेल्यानंतर त्या तणावात होत्या, दुःखी होत्या, यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version