Download App

फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी आरक्षणाची आंदोलनं; 70 वर्ष प्रस्थापित मराठे गांजा ओढत होते का?

सातारा : केवळ देवेंद्र फडणवीस या माणसाला घेरण्यासाठी आताच मराठा समाजाची आंदोलन सुरू झाली, पण सत्तर वर्ष प्रस्थापित मराठी सत्तेवरती होती ते काय गांजा वाढत होते का? ते काय गोट्या खेळत होते का? अशा शब्दात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मराठा आरक्षण आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. ते कराडमध्ये माध्यमांशी बोलत होते. (movement of the Maratha community started just now to put Devendra Fadnavis in trouble)

काय म्हणाले सदाभाऊ खोत?

त्यावेळच्या फडणवीस सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले होते. उच्च न्यायालयात ते आरक्षण टिकले होते. पण त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये आघाडी सरकारच्या काळात ज्या पद्धतीने भूमिका घेतली पाहिजे होती ती भूमिका घेतली गेली नाही. यामुळे दुर्दैवानं मराठा समाज मागासलेला आहे सिद्ध होऊ शकलं नाही आणि आरक्षण नाकारलं गेलं. आताच मराठा समाज अनेक समाजाची आंदोलन सुरू झाली, पण सत्तर वर्ष प्रस्थापित मराठी सत्तेवरती होती ते काय गांजा वाढत होते का? ते काय गोट्या खेळत होते का?

अजितदादांनी नकाराचा ‘काही दिवसांतच’ बदला घेतला; मीरा बोरवणकरांचा आणखी एक स्फोटक दावा

70 वर्षांमध्ये प्रस्थापित मराठ्यांनी मराठ्याला आरक्षण का दिलं नाही? त्यावेळी तुम्ही कुठे काशीला गेला होता का? केवळ देवेंद्र फडणवीस या माणसाला घेरण्यासाठी अशा पद्धतीची हत्यार राज्यामध्ये वापरली जात आहेत हे वेळोवेळी सिद्ध झाले. फक्त बोलायचं कोण धाडस करत नाही. कारण जो बोलल त्याला टार्गेट केलं जातं. आमच्यासारख्या फकीर माणसाला त्याची काय फिकीर नसते, असं म्हणत खोत यांनी टीका केली आहे.

ललित पाटीलप्रकरणात भाजप मंत्र्याचा हात; रवींद्र धंगेकरांचा खळबळजनक आरोप

मराठा आरक्षण प्रश्नी जरांगे पाटील यांचे आंदोलन :

राज्यात मागील दोन महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या प्रश्नाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या आणि ओबीसीमध्ये घ्या, अशी मागणी करत जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावातील मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केले होते. जवळपास दोन आठवड्यांच्या उपोषणानंतर आणि सरकार सोबतच्या चर्चेनंतर त्यांनी सरकारला या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी 40 दिवसांची मुदत दिली आहे. ही मुदत संपण्यासाठी आता अवघे काही दिवस राहिले आहेत. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसणार असल्याचे सांगितले आहे.

Tags

follow us