MP Supriya Sule Call To Karishma Kapoor : अभिनेता सैफअली खानवर (Saif Ali Khan) चाकू हल्ला झाला. आज सकाळी या घटनेची माहिती समोर आली. तेव्हा खासदार सुप्रिया सुळे या पुण्यात एका कार्यक्रमात होत्या. घटनेची माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळेंनी सैफच्या घरी फोन लावून त्याबद्दल चौकशी केल्याचं समोर आलंय. यावेळी सु्प्रिया सुळेंनी (Supriya Sule) खासदार करिश्मा कपूरला (Karishma Kapoor) फोन केलाय. यावेळी सुळे म्हणाल्या की, हे लोलो…ऑल ओके. व्हाट हॅप्पन्न..इवरिथिंग इज ओके ना, असा त्यांच्यात संवाद झालाय. यावेळी फोनवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आई बाबांना या हल्ल्याबद्दल इतक्यात काही सांगु नका.
अजिंठा वेरुळ चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन; सई परांजपेंना जीवनगौरव पुरस्कार
सुप्रिया सुळे यांनी फोनवरील व्यक्तीला सांगितलंय की, बेबो आणि सैफला सांग फोन केला होता. काय होतंय, ते सांगत राहा. काळजी घ्या. माझी काही मदत लागली, तर मला सांगा. यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या की, काल रात्री हा हल्ला झालाय. सैफ अली खान सेफ आहेत. ते सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत. कुटुंबाचं ऑफिशअल स्टेटमेंट आणि पोलिसांचं ऑफिशअल स्टेटमेंट आल्यानंतर बोलू या, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. या प्रकरणी त्या गृहमंत्र्यांशी देखील संवाद साधणार आहे.
अखेर गाझा युद्ध संपलं! लवकरच होणार युद्धविराम; वाचा इस्त्रायल-हमास युद्धाची टाइमलाइन
बॉलीवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता सैफअली खान याच्यावर काल 15 डिसेंबर रोजी रात्री राहत्या घरी एका चोराने धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये सैफ अली खानला गंभीर दुखापत झालीय. चोराने थेट सैफच्या मानेवर आणि पाठीवर वार केलेत. सैफच्या मानेवर 10 सेंटीमीटरची खोल जखम झाल्याची माहिती मिळतेय. या घटनेमुळे मोठी खळबळ उडालीय. रात्री अडीच वाजता हा प्रकार घडल्याची माहिती मिळतेय. .
सुप्रिया सुळे सैफच्या कुटुंबीयांशी फोनवर बोलत असतानाचा संवाद समोर आलाय. फोनवरून सुप्रिया सुळेंनी नेमका कोणासोबत संवाद साधला, हे समजू शकलेली नाही. परंतु बॉलीवूडमध्ये लोलो म्हणून करिश्मा कपूरला संबोधलं जातं. त्यामुळे त्यांनी हा फोन करिश्मा कपूरलाच लावला असावा, असा कयास बांधला जातोय. मात्र, त्यांचं बोलणं करिना कपूरची बहीण करिश्मा कपूरसोबत झाला असावं, असा अंदाज बांधला जातोय. तर अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून सात पथके तयार केले आहेत. मुंबई पोलीस या प्रकरणी वेगवेगळ्या अँगलने तपास करीत आहे.