MPSC Students Protest : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या पुण्यातील विद्यार्थ्यांनी आज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरुन ठिय्या आंदोलन (MPSC Students Protest) सुरु केलं आहे. अचानक विद्यार्थ्यांनी शास्त्री रस्त्यावर आंदोलन सुरु केल्यानं, इथली वाहतूक विस्कळीत झाली आहे. पण यामुळं पोलिसांची मात्र धावपळ उडाली.
स्टॅलिनसारखी हिंमत ठाकरेंनी दाखवली असती तर…कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी केला मोठा खुलासा
याआधीही पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. स्पर्था परिक्षेसंदर्भातील विविध मागण्यांसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी भर रस्त्यावर आपला ठिय्या मांडला असून आंदोलन सुरु केलंय. त्यामुळे वाहतूक कोंडी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
उदयनराजेंना महात्मा फुलेंचं महत्त्व कमी करायचं…, ‘त्या’ वक्तव्यावरून ओबीसी नेते संतापले
दरम्यान, पोलिसांकडून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची समजूत घालण्यात येत आहे. मात्र विद्यार्थी काहीही एक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याची परिस्थिती आहे. एकीकडे पोलिस समजूत घालत आहेत तर दुसरीकडे विद्यार्थी आंदोलन करण्यावर ठाम आहेत. त्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडालीयं.